ludhiana AAP MLA Gurpreet Bassi Gogi dies : पंजाबमधील लुधियाना पश्चिमचे आमदार व आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत बस्सी गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. त्यांना जखमी अवस्थेत दयानंद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. मात्र, त्यांची स्थिती इतकी गंभीर होती की डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. गोगी हे शुक्रवारी (१० जानेवारी) रात्री एक कार्यक्रम आटपून घरी परतले होते. ते त्यांच्या खोलीत बसून जेवत असताना बंदूकीच्या गोळीचा मोठा आवाज कानावर पडला. त्यानंतर त्यांची पत्नी डॉ. सुखचन कौर गोगी या गुरप्रीत यांच्या खोलीत गेल्या. गुरप्रीत गोगी हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते. सुखचन यांनी गुरप्रीत यांना ताबडतोब रुग्णालयात नेलं. मात्र, रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार गुरप्रीत बस्सी गोगी यांना त्यांच्याच पिस्तुलातून सुटलेली गोळी लागली आहे. गोळी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ज्या पिस्तुलातून सुटलेली गोळी त्यांना लागली होती त्या पिस्तुलाचा गोगी यांच्याकडे परवाना होता. दरम्यान, गोगी यांना रुग्णालयात नेत असतानाच रुग्णालय प्रशासनाला सर्व माहिती पुरवण्यात आली होती. जेणेकरून रुग्णालयात डॉक्टरांचं पथक सज्ज असेल आणि त्यांच्यावर उपचार करण्यास वेळ लागणार नाही. मात्र, डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

Accidents caused by protection or hunting of wild boars in Palghar taluka
शहरबात : रानडुक्कर आणि दुर्घटना
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Vikas Walkar Shraddha Walkar father death
श्रद्धा वालकरच्या अस्थिविसर्जनाचे कार्य अधुरेच राहिले, वडिल विकास वालकर यांनी घेतला जगाचा निरोप
Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
Woman murdered in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात

हे ही वाचा >> “मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य

रुग्णालयात उपचारांदरम्यान गुरप्रीत गोगी यांची प्राणज्योत मालवली

डॉ. सुखचन कौर या गुरप्रीत गोगी यांना घेऊन रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने ताबडतोब त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांच्या शरीरातील गोळी देखील बाहेर काढली. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा >> Cardiac Arrest : तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू! कर्नाटकनंतर गुजरातमध्येही समोर आला धक्कादायक प्रकार

या घटनेची माहिती मिळताच लुधियानाचे पोलीस आयुक्त कुलदीप चहल डीएमसी रुग्णालयात दाखल झाले. पाठोपाठ पोलीस उपायुक्त शुभम अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त रमनदीप भुल्लर, सहाय्यक पोलीस आयुक्त अकशी जैन रुग्णालयात दाखल झाल्या. डीएमसीमधील आपत्कालीन विभाग व रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबतची अधिक माहिती देण्यास नकार दिला.

Story img Loader