मीरारोडमधील सरस्वती हत्या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच लुधियानामध्ये अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेनं आपल्याच मामाच्या हत्येसाठी चुलत भावंडांना ५० हजार रुपये देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही, तर हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह दिवाणमध्ये ठेवून पेटवून दिल्याचंही समोर आलं आहे. हा सगळा प्रकार लुधियानामधील असून याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं घडलं काय?

लुधियानातील खेरी-ठाकरवाल गावाजवळ काही स्थानिकांना सोमवारी काहीतरी जळत असल्याचं निदर्शनास आलं. काळजीपूर्वक पाहिलं असता एका लाकडी बॉक्समध्ये एक मृतदेह जळत असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सर्व परिस्थितीची माहिती घेतली आणि पुढील तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फूटेजमधून झाला उलगडा!

दरम्यान, पोलिसांनी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर सर्व प्रकरणाचा उलगडा पोलिसांना झाला. एका सायकल ट्रॉलीवर एक सिंगल दिवाण लादून घेऊन जाताना दोन व्यक्ती पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसल्या. आगीत जळणारा तोच दिवाण असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी त्या दोघांसह एका महिलेलाही अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून खरा प्रकार समोर आला.

भाचीनंच दिली मामाच्या हत्येची सुपारी!

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला ही मृत व्यक्तीच्या बहिणीची मुलगी आहे. मृत व्यक्तीचं नाव गुरदीप सिंग (६१) असून अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये महिलेचा भाऊ सुखविंदर सिंग (३०) आणि त्याचा मित्र योगेश कुमार यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव जशनप्रीत कौर असं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जशनप्रीत कौरनं तिचा भाऊ सुखविंदरकडे गुरदीप आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केली होती. गुरदीपची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी जशनप्रीतनं त्याला ५० हजार रुपयेही दिले होते. यानंतर सुखविंदरनं योगेश कुमारच्या साथीने गुरदीप सिंगची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेग दिवाणमध्ये टाकून तो दिवाण त्यांनी सायकल ट्रॉलीवर जवळच्या गावातील कॅनलजवळ नेला. तिथे तो लाकडी बॉक्स पेटवून दिला. पण गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.