दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जर्मनीच्या लुफ्तान्सा एअरलाइन्सच्या प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. जर्मनस्थित असेल्या या एअरलाइन्सचे वैमानिक पगारासाठी एकदिवसीय संपावर गेले आहेत. त्यामुळे लुफ्तान्सा एअरलाइनसची सुमारे ८०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही प्रवाशांना विमानाची विमानांची वाट पाहत आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे.
उड्डाणे रद्द झाल्याची माहिती मिळताच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतमध्ये ७०० हू अधिक प्रवाशांनी, तर टर्मिनल – ३ च्या बाहेर २०० प्रवाशांनी आंदोलन केलं. त्यानंतर सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांनी विमान कंपनीकडून प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केले जात असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रवाशांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
“मला लुफ्तान्सा एअरलाइन्सने जर्मनीला जायचे होते. पण, अचानक सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. आता एमिरेट एअरलाइन्सची तिकीटे मी बुक केली असून, दुबईमार्गे मी जाणार आहे. त्यासाठी १४ तास थांबावे लागतील. मात्र, लुफ्तान्सा एअरलाइन्सने अद्याप आमचा परतावा दिला नाही,” असे एका प्रवाशाने सांगितलं आहे.