उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरतील लुलू मॉलमध्ये विनापरवानगी नमाज पठण केल्याच्या आरोपाखाली लखनौ पोलिसांनी आणखी दोघांना अटक केले आहे. मोहम्मद इरफान आणि सौद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याआधी पोलिसांनी मोहम्मद आदील, मोहम्मद रेहान, आतिफ खान, मोहम्मद लोकमान आणि मोहम्मद नोमान अशा पाच जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेले सात जण लुलू या मॉलमध्ये नमाज पठण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मॉल प्रशासनने अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा >>> “४२ वर्षांपासून राजकारणात, २५ वर्षे आमदार, ३ वेळा मंत्री” उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना सत्तारांनी मांडली कारकीर्द

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

लुलू मॉल प्रशासनाने नमाज पठण करणाऱ्या अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत भारतीय दंडविधानाच्या कलम १५३-ए (१), २९५-ए, कलम ३४१, कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी पोलिसांनी अगोदर मोहम्मद आदील, मोहम्मद रेहान, आतिफ खान, मोहम्मद लोकमान आणि मोहम्मद नोमान या पाच जणांना ताब्यात घेतले होते. तर आता मोहम्मद इरफान आणि सौद अशा आणखी दोन आरोपांनी अटक करण्यात आले आहे. तशी माहिती लखनौचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश श्रीवास्तव यांनी दिली.

हेही वाचा >>> पाकव्याप्त काश्मिरींना स्वातंत्र्य कधी मिळणार? RSS चा प्रश्न

नेमके प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार लखनऊ येथील लुलू मॉलचे १० जून रोजी उद्घाटन करण्यात आले होते. या मॉलच्या उभारणीसाठी एकूण २ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र उद्घाटनाच्या दोन दिवसानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती मॉलच्या परिसरात नमाज पठण करत असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉल प्रशासनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात येत होती. या मॉलमध्ये बाहेरच्या राज्यातील जास्तीत जास्त मुस्लीम लोकांना नोकरी देण्यात आली, असा आरोप केला जात होता. त्यानंतर मॉल प्रशासनाने एक निवेदन जारी करत आमच्या मॉलमध्ये ८० टक्के हिंदू कर्मचारी आहेत, असे स्पष्टीकरण दिले होते.