१९९३ च्या मुंबईमधील बाँबस्फोट प्रकरणातील फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला गुन्हेगार याकुब मेमन याला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची इंग्रजी साहित्य विषयातील पदव्युत्तर पदवी मिळाली आहे. येथील मध्यवर्ती कारागृहात याच प्रकरणातील अन्य सात गुन्हेगारांसह मेनन याला विद्यापीठाद्वारे ही पदवी मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. मेमन वगळता अन्य सात जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मेमन शिक्षा भोगीत असल्याने त्याला नागपूर येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्रात झालेल्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहाण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली.

Story img Loader