एम.जे.अकबर यांनी अखरे बुधवारी संध्याकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. #MeToo मोहिमेतंर्गत तब्बल २० महिलांनी एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केले होते. मोदी सरकारकमध्ये ते परराष्ट्र राज्यमंत्री होते.
अकबर यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर
– एम.जे.अकबर यांचे संपूर्ण नाव आहे मोबाशार जावेद अकबर.
– ११ जानेवारी १९५१ रोजी एका बिहारी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
– ७० च्या दशकात कोलकातामधून त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
– १९७१ साली ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झाले.
– त्यानंतर ते इलयुस्ट्रेटेड विकली या साप्ताहिकात उपसंपादक म्हणून रुजू झाले.
– १९७६ साली ते आनंद बाझार पत्रिका समूहाच्या ‘द संडे’ या राजकीय साप्ताहिकाचे संपादक झाले.
– द संडेच्या यशानंतर १९८२ साली त्यांनी द टेलिग्राफ हे वर्तमानपत्र लाँच केले.
– १९८९ साली एम.जे.अकबर यांनी राजकारणात उडी घेतली. १९८९ साली काँग्रेसच्या तिकिटावर ते बिहारच्या किशनगंजमधून निवडणूक जिंकले व पहिल्यांदा लोकसभेत गेले.
– १९९१ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे अधिकृत प्रवक्ते होते.
– १९९२ साली ते पुन्हा पूर्णवेळ पत्रकारितेत आले.
– १९९३ साली एम.जे.अकबर नव्याने सुरु झालेल्या एशियन एज या वर्तमानपत्राचे संपादक झाले. आंतरराष्ट्रीय राजकारणाला केंद्रीत ठेऊन हा पेपर सुरु करण्यात आला होता.
– मार्च २००८ साली एशियन एजमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी १३ मे २००८ रोजी कॉर्व्हट हे राजकीय नियतकालिक सुरु केले.
– इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादकपद भूषवताना त्यांनी अनेक पुस्तकांचेही लेखन केले.
– पत्रकारीतेत दोन दशक काम केल्यानंतर मार्च २०१४ मध्ये पुन्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
– भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाचे प्रवक्तेपद देण्यात आले.
– नरेंद्र मोदींचा विश्वास संपादन केल्यानंतर ५ जुलै २०१६ रोजी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
– भाजपाने मध्य प्रदेशातून त्यांना राज्यसभेवर पाठवले.
– केंद्रीय परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत असताना देशात #MeToo मोहिम सुरु झाली. त्यावेळी अनेक महिलांनी पुढे येऊन त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडली.
– एम.जे.अकबर यांच्या विरोधात महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचे आरोप केले. त्यामुळे १७ ऑक्टोंबर २०१८ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.