देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र इंडियन मेडिकल असोसिएशननं तिसऱ्या लाटेबाबत सरकारला इशारा दिला आहे. दुसरीकडे करोनामुळे देशात मृतांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यात आता मध्य प्रदेशात करोनामुळे मृतांच्या आकडेवारीत एका दिवसात विक्रमी नोंद झाली आहे. एका दिवसात १ हजार ४७८ जणांची यात नोंद करण्यात आल्याने एकूण मृतांचा आकडा १० हजारांच्या पार गेला आहे. तर देशातील मृत्यू दर हा १.३३ टक्के इतका झाला आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात मृतांचा आकडा १०० च्या खाली होता. त्यात सोमवारी अचानक १,४७८ जणांची भर पडल्याने चिंतेत भर पडली आहे. मध्य प्रदेशात मृतांचा एकूण आकडा हा १०,५०६ इतका झाला आहे. त्यानंतर या आकडेवारीबाबत सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे.

खासगी रुग्णालय आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्या मृत्यूची नोंद या आकडेवारीत नव्हती. मात्र त्याबाबत माहिती घेऊन मृतांच्या आकडेवारीत नोंद करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यात खासगी रुग्णालयात ७६२ जण, तर होम आयसोलेशनमध्ये २०८ जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या जिल्ह्यातील ५०८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

Coronavirus : महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या दिशेनं?; आकडेवारी मांडत तज्ज्ञांनी दिले संकेत

मध्य प्रदेशात १ हजार ४७८ मृत्यूंची नोंद झाल्याने देशाच्या आकडेवारीतही भर पडली आहे. देशातील मृतांचा एकूण आकडा हा ४ लाख १० हजार ७८४ इतका झाला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमध्येही मृतांच्या आकडेवारीत अशीच भर घालण्यात आली होती. ९ जून रोजी ३ हजार ९५१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे बिहारमध्ये मृतांचा आकडा ९ हजारांच्या पार गेला होता.

इराक : कोविड रुग्णालयात आगीचा भडका; ४४ रुग्णांचा होरपळून मृत्यू, ६७ जण जखमी

देशात सोमवारी दिवसभरात ३१ हजार ४४३ नव्या बाधितांची नोंद झाली. गेल्या ११८ दिवसातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ३१ हजार ३१५ वर पोहोचली आहे. गेल्या १०९ दिवसांतली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. दिवसभरात एकूण ४९ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३ कोटी ६३ लाख ७२० वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बर होण्याचा दर आता ९७.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.दिवसभरात २०२० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या आता ४ लाख १० हजार ७८४ वर पोहोचली आहे. तर देशाचा मृत्यूदर १.३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.