काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी मुस्लिम मतदारांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. मुस्लिम काँग्रेसची ‘व्होट बँक’ आहेत, असे कमलनाथ त्या व्हिडिओत म्हणताना दिसतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही ते देताना दिसतात. मागील निवडणुकीमध्ये मुस्लिम बहुल भागात ९० टक्के मतदान का नाही झाले, याची चौकशी करा, असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत संघाच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. या वक्तव्यांमुळे कमलनाथ अडचणीतही येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडिओत कमलनाथ बैठकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना दिसतात. ते म्हणाले, मागील नोंदी पाहण्याची माझी तुम्हाला विनंती आहे. संघाचे मतदार काय करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते काय करत आहेत. आरएसएसचे लोक विखुरले आहेत. त्यांच्याबाबत तुम्ही मला माहिती द्या. छिंदवाडाबाबत तेथील लोक मला सांगतात. त्यांची एक घोषणा आहे, जर हिंदूंना मतदान करायचे असेल तर ‘हिंदू वाघ मोदीं’ना मतदान करा. जर मुसलमानांना मतदान करायचे असेल तर काँग्रेसला द्या. या केवळ दोन ओळी आहेत. ते मतदारांना जास्त शिकवायला जात नाहीत.

ही त्यांची रणनीती आहे. यासाठी तुम्ही सर्वजण सतर्क राहिले पाहिजे. कृपया तुम्ही मागील नोंदी तपासून पाहा. हे सर्व इंटरनेटवर उपलब्ध आहे. जिथे मुसलमान मतदान आहे. तिथे किती टक्के मतदान झाले आहे. जर ५०-६० टक्के मतदान झाले असेल तर ९० टक्के मतदान का झाले नाही. मागील निवडणुकीचे ‘पोस्टमार्टम’ करणे आवश्यक आहे. मुसलमान समाजाचे ९० टक्के मतदान झाले नाही तर आपले मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही ८० च्या दशकाबाबत बोलत आहात. पण मी ९० च्या दशकाबाबत सांगत आहे आणि आपल्यासमोर आकडेवारी आहे.