मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच इंडिया आघाडीत फूट पडल्याचं दिसत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची मध्य प्रदेशातील टीकमगड येथे प्रचार सभा झाली. यावेळी अखिलेश यादव यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. काँग्रेस खूप चालू ( चतूर ) पक्ष आहे. काँग्रेसने आम्हाला धोका दिला आहे. तर, तुम्हालाही धोका देऊ शकते, असा हल्लाबोल अखिलेश यादव यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“याआधी काँग्रेसने जातनिहाय जनगणना आणि मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी थांबवली होती. सत्ताधारी भाजपाही हीच भूमिका घेत आहे. काँग्रेस आणि भाजपा दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला आपल्याकडं ओढण्यासाठी जातनिहाय जनगनणा आ णि आरक्षणाबाबत बोलत आहेत. कारण, दोन्ही पक्षांना या समाजाच्या ताकदीचा अंदाज आला आहे,” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘मी मुख्यमंत्रिपदाची चिंता करीत नाही’, भाजपाने नाव घोषित न केल्यामुळे शिवराज चौहान यांची भूमिका

अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशातील महिला, दलित आणि आदिवासींवरील अत्याचारावरून भाजपा सरकारवर टीकास्र डागलं आहे. “देशात महिलांवर सर्वाधिक अत्याचार मध्य प्रदेशात होत आहेत. दलित आणि आदिवासींवरही मध्य प्रदेशात अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत,” असेही अखिलेश यादव यांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘राजीव गांधी यांनी बाबरीचे कुलूप उघडले होते’, राम मंदिराच्या श्रेयाबाबत कमलनाथ यांनी भाजपाला सुनावले

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष इंडिया आघाडीतील घटकपक्ष आहेत. पण, १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी २३० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते, कमलनाथ यांच्यात जागावाटपावरून तणाव निर्माण झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh assembly election 2023 congress chalu party dont vote say akhilesh yadav ssa