फोर्ब्स मासिकात जगातील प्रभावशाली व्यक्तीच्यां यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड झाल्यावरून मध्यप्रदेश विधानसभेत अभिनंदन ठराव मांडण्यात आला. मात्र भाजपाकडून मांडलेल्या या अभिनंदन प्रस्तावाला कॉंग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
भाजपाचे कैलाश विजयवर्गीय यांनी यासंबधीचा ठराव मांडला. या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्ष सीताशरण शर्मा यांनी देखील अनुमोदन दिले. अध्यक्षांनी कोणत्या नियमाखाली अभिनंदन ठरावाला अनुमोदन दिल्याचा काँॅंग्रेसचे बाला बच्चन यांनी आक्षेप घेतला.
२०१४ साली फोर्ब्सने नरेंद्र मोदी यांची प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत १४ व्या स्थानी निवड केली होती, तर २०१५ साली मोदींना ९ वे स्थान देण्यात आले आहे. या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन पहिल्या स्थानावर आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा