मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा करिष्मा पुन्हा एकदा कामी आला. त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक करून गुजरातमध्ये मोदींनी जे करून दाखवले त्याच वाटेने प्रवास सुरू केला आहे. मोदी यांच्यासारखे ते आक्रमक मुळीच नाहीत, त्यामुळे विजयासाठी आक्रमकताच लागते हा ठोकताळाही त्यांनी चुकीचा ठरवला आहे.
चौहान हे आक्रमक नाहीत तर काहीसे प्रसिद्धीपासून दूर राहणारे नेते आहेत. त्यांनी दिल्लीच्या तख्तावर डोळा न ठेवता मध्य प्रदेशवर लक्ष केंद्रित केले, त्याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला. ते राज्याचा आणखी विकास करतील या आशेने लोकांनी मतांचे माप भरभरून त्यांच्या पदरात टाकले आहे. चौहान हे १९९०मध्ये बुधनी मतदारसंघातून प्रथम विधानसभेवर निवडून आले. दहाव्या लोकसभेत ते प्रथम विदिशा मतदारसंघातून निवडून गेले. १९९६मध्ये ते ११व्या लोकसभेत पुन्हा निवडून आले. १९९८मध्ये बाराव्या लोकसभेत परत खासदार झाले. तेराव्या लोकसभेत १९९९मध्ये व चौदाव्या लोकसभेत २००४मध्ये ते पुन्हा निवडून आले. ते संसदेच्या शहर विकास, ग्रामीण विकास, मनुष्यबळ विकास अशा अनेक खात्यांच्या स्थायी समित्यांचे अध्यक्ष होते.
मध्य प्रदेश
*काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांचे पुत्र जयवर्धन सिंग यांनी राघोगड (जि.गुणा) मतदारसंघात भाजपचे राधेशाम धाकड यांचा ५८२०४ मतांनी पराभव केला.
*शिवपुरी मतदारसंघात भाजपच्या यशोधरा राजे शिंदे यांनी काँग्रेसचे वीरेंद्र सिंग यांच्यावर १११४५ मतांनी विजय मिळवला.
*काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांचा भोजपूर मतदारसंघात भाजपचे सुरेंद्र पटवा यांनी २०१४९ मतांनी पराभव केला.
*होशंगाबाद येथे काँग्रेसचे रविकिशोर जैसवाल भाजपचे सीताशरण शर्मा यांच्याकडून ४९२९६ मतांनी पराभूत झाले.
एकूण जागा २३०
२०१३ २००८
भाजप १६४ १४३
काँग्रेस ५९ ७१
इतर ०७ ०९
भारतीय पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आणि त्यांचे नेते यांचा हा विजय आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी, उमा भारती, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रसिंग तोमर यांचे मी आभार मानतो. आजचा विजय हा लोकांच्या प्रेमाचा व आशीर्वादाचा परिणाम आहे. आता आमच्यावरील जबाबदारी वाढली असून राज्याच्या विकासात यापुढेही कोणतीही कसूर केली जाणार नाही. केंद्रातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकार राज्याशी दुजाभाव करते, त्यामुळे दिल्लीतही भाजपप्रणीत सरकार आणणे ही काळाची गरज आहे. २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातून जास्तीत जास्त खासदार निवडून जातील, अशी मला आशा आहे.
शिवराजसिंग चौहान, , मुख्यमंत्री मध्य प्रदेश
या पराभवामुळे राज्यात सामूहिक नेतृत्वाला अपयश आले हे दिसून येत आहे. सर्व पातळय़ांवर आम्ही अपयशी ठरलो आहोत, हे केवळ अपयश, अपयश, अपयश आहे, यात शंका नाही. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्यात आक्रमक प्रचार केला होता. त्याचा मात्र राज्यात काही परिणाम झाला नाही. याचाच दुसरा अर्थ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या कामाचा थोडा परिणाम झाला आहे. दलित-ओबीसी यांच्याशी काँग्रेसची नाळ तुटली आहे ती पुन्हा जोडली गेली पाहिजे, पक्ष कार्यकर्त्यांनीही या गटाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
विधानसभा निवडणुकीतील निकालांचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकांच्या निकालांवर होईल असे कुणी समजण्याचे कारण नाही. हे काही लोकसभा निवडणुकीचे प्रतिबिंब नाही. २००८ मध्ये आम्ही विधानसभेला मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन्ही राज्यांत हरलो होतो. पण आम्ही लोकसभा निवडणुका दोन्ही राज्यांत चांगल्या प्रकारे जिंकल्या आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री, प्रमुख मध्य प्रदेश प्रचार समिती (काँग्रेस)
मध्य प्रदेशात शिवराजच ‘सिंह’
मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा करिष्मा पुन्हा एकदा कामी आला. त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक करून गुजरातमध्ये मोदींनी
First published on: 09-12-2013 at 02:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh assembly polls shivraj set for third term