भोपाळ : भाजप विरुद्ध काँग्रेस असा विलक्षण चुरशीने रंगलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार बुधवारी संपला. राज्यातील २३० जागांसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याचबरोबर छत्तीसगडमध्येही ७० जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशात २५३३ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस प्रियंका गांधी तसेच भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही जोरदार प्रचार केला.

हेही वाचा >>> सलमान खानच्या ‘तेरे नाम’चा उल्लेख करत प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला, म्हणाल्या…

समाजवादी पक्षाने ७१ उमेदवार उभे केले आहेत. तर आम आदमी पक्षाने ६६ जागी उमेदवार दिल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याची टीका भाजपने केली होती. बहुजन समाज पक्षाचे १८३ उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकूण १४ प्रचारसभा घेतल्या. भाजपची सारी भिस्त पंतप्रधानांवरच आहे. तर काँग्रेसने सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. मध्य प्रदेशात ४८ टक्के इतर मागासवर्गीय आहेत.

छत्तीसगडमध्ये आरोप-प्रत्यारोप

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ७० जागांसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होईल. यंदाच्या प्रचारात काँग्रेस विरुद्ध भाजप असे जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. विशेषत: मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना भाजपने लक्ष्य केले. महादेव अ‍ॅपचा मुद्दा यात केंद्रस्थानी होता. तर काँग्रेस नेत्यांनी प्रचारात सरकारच्या कल्याणकारी योजनांवर भर दिला. दुसऱ्या टप्पात ९५८ उमेदवार आहेत. सध्या राज्यात एकूण ९० जागांपैकी काँग्रेसच्या ७१ जागा असून भाजपचे १५ आमदार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh chhattisgarh campaign ends voting tomorrow zws