पीटीआय, भोपाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी काँगेसचे नेते दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांचा उल्लेख ‘शोले’ चित्रपटातील पात्र ‘जय’ व ‘वीरू’ असा केला. लुटलेल्या लूटच्या वाटपावरून ‘जय’ व ‘वीरू’ यांची आपापसात भांडणे चालू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंग यांची अनुक्रमे अमिताभ बच्चन आणि धर्मेद्र यांनी साकारलेली ‘जय’ आणि ‘वीरू’ या पात्रांची बरोबरी केल्यानंतर त्यांची टीका झाली. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, दिग्विजय सिंह आणि कमलनाथ मंगळवारी पक्ष नेतृत्वाची भेट घेण्यासाठी दिल्लीत आहेत.काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री चौहान म्हणाले, ‘‘जय-वीरू जोडीला दिल्लीत बोलावण्यात आले.

हेही वाचा >>>राष्ट्रपतींची ‘मेजर’ कारवाई! संरक्षण दलाच्या ‘या’ विभागातील अधिकाऱ्याची तडकाफडकी हकालपट्टी

त्या दोघांच्या मतभेदांबाबत भाजप संभ्रम निर्माण करत असल्याचे हे दोनही नेते सांगतात. मग काँग्रेस नेतृत्वाने त्यांना दिल्लीत का बोलावले. ‘जय’ व ‘वीरू’ लुटलेल्या मालावरून आपापसात भांडत आहेत. २००३च्या आधी दिग्विजय सिंह यांनी संपूर्ण राज्य लुटले आणि उद्ध्वस्त केले. तर १५ महिन्यांच्या राजवटीत कमलनाथ यांनीही मध्य प्रदेशला लुटीचे केंद्र बनविले. आता त्यांच्यात वाद आहे की लुटीचा पुढचा भाग कोणाला,  किती वाटा मिळणार यावरून आहे.’’

सुरजेवाला यांनी शनिवारी सांगितले की, दिग्विजय व कमलनाथ यांच्यातील नातेसंबंध ‘शोले’मधील धर्मेद्र (वीरू) आणि अमिताभ बच्चन (जय) यांनी साकारलेल्या पात्रांमधील होते. गब्बर सिंग या दोघांमध्ये भांडण लावू शकला नाही. त्याप्रमाणे भाजपचे  गब्बर सिंगही असे करू शकणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh chief minister shivraj singh chouhan criticizes congress leaders digvijay singh and kamal nath amy