मध्यप्रदेशातील इंदुर बीएम महाविद्यालयाच्या एका माजी विद्यार्थ्याने कथितरित्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पेटवल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्यास मार्कशीट मिळण्यास विलंब होत असल्याने, तो नाराज होता आणि यामधून त्याने हे भयानक कृत्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना काल(सोमवार) घडली, जेव्हा आरोपी विद्यार्थी आशुतोष श्रीवास्तव याने ४९ वर्षीय प्राचार्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. या घटनेत प्राचार्या स्वत:ला वाचवण्यासाठी महाविद्यालयाच्या इमारतीकडे धावल्या, तेव्हा अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.या घटनेत प्रचार्या ८० टक्के जळाली आहे. प्रचार्या पेटवणारा आरोपी विद्यार्थी देखील पेटला होता, ज्यानंतर त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याला पोलिसांनी पकडले.

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्याला मार्कशीट मिळत नसल्याने तो नाराज होता. एवढच नाहीत मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याने प्राध्यपकावर चाकूने हल्लादेखील केला होता. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्याविरोधता कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली की, आरोपी विद्यार्थ्याने स्वत:ला संपवण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याला पोलिसांनी पकडले. आम्हाला माहिती मिळाली आहे की हा विद्यार्थी सातव्या सत्रात नापास झाला होता. आठव्या सत्रातील परीक्षा त्याने दिली आणि त्यात तो पास झाला होता मात्र त्याला मार्कशीट मिळत नव्हती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh college principal set on fire by former student msr