Egg seller gets Rs 6 crore tax notice : खोटी ओळख वापरून फसवणूक केल्याचा एक धक्कादायक प्रकरण मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातून समोर आले आहे. येथे एका अंडे विक्रेत्याला आयकर विभागाकडून जीएसटीच्या ६ कोटी रूपयांच्या थकबाकीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अंडी विक्रेत्याच्या नावाखाली चालवल्या जात असलेल्या कंपनीने गेल्या दोन वर्षांत कर न करता ५० कोटी रूपयांचा व्यवसाय केल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

या नोटीशीमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, या फर्मचे नाव प्रिन्स इंटरप्रायजेस असून ती २०२२ मध्ये दिल्लीतील स्टेट झोन ३, वॉर्ड ३३ मध्ये रजिस्टर करण्यात आली आहे. या कंपनीकडून लेदर, लाकूड आणि लोखंड यांचा व्यापार केला जातो आणि तिची २०२२ आणि २०२४ दरम्यानचे उत्पन्न ५० कोची रुपये आहे. पण या कंपनीने त्यांचा जीएसटी भरला नाही, ज्यामुळे त्यांना ६ कोटींच्या थकीत कराची नोटीस पाठवण्यात आली आहे,

दरम्यान ज्याला ही नोटीस मिळाली आहे त्याचे नाव प्रिन्स सुमन असे असून तो दामोहचा रहिवासी आहे. प्रिन्स ह रस्त्यावरील गाडीवर अंडी विकून उदरनिर्वाह करतो. माध्यमांशी बोलताना त्याने नोटीस पाहून आपल्याला धक्का बसल्याचे सांगितले. तसेच आपण कधीही दिल्लीला गेलो नाही आणि त्याच्या नावावर रजिस्टर करण्यात आलेल्या कंपनीबद्दल त्याला काहीच माहिती नाही, असेही त्याने सांगितले.

प्रिन्सने खुलासा केला की २०२३ मध्ये, त्याने इंदूरमध्ये काही काळासाठी मजूर म्हणून काम केले होते परंतु कधीही त्याचे पॅन कार्ड किंवा आधार तपशील कोणालाही शेअर केले नाहीत. आता घाबरलेल्या त्याच्या कुटुंबाला त्याच्या ओळखीच्या बनावट वापरामुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.

हा प्रकार समोर आल्यानंर प्रिन्सने सांगितलं खी त्याने २०२३ मध्ये खाही काळासाठी मजूर म्हणून इंदौरध्ये काम केले होते, पण या काळात त्याने त्याचा पॅन कार्ड क्रमांक किंवा आधार संबंधित माहिती कोणालाही दिली नव्हती. त्याचे कुटुंबिय सध्या भीतीच्या छायेखाली आहे.

ही नोटीस पाठवल्यानंतर आयकर विभागाने प्रिंसकडून त्याचे बँक स्टेटमेंट्स आणि इतर कागदपत्रे मागितली आहेत. प्रिन्सचे वडील श्रीधर सुमन हे लहानसे किराणा मालाचे दुकान चालवतात, त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे एक औपचारिक तक्रार देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात पुढील तपास केला जात आहे.