किन्नर समाजाच्या गुरु सुरैया यांची सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे. शुक्रवारी त्या किन्नरांच्या एका शोभायात्रेमध्ये १० किलो सोनं परिधान करुन सहभागी झाल्या होत्या. या सोन्याची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे. सुरैयांसोबत या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या इतर किन्नर समाजातील सदस्यांनाही बरंच सोनं घातलं होतं. अनेकजण सुरैया यांनी परिधान केलेलं सोनं आणि ही रथयात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्याकडेला उभे होते. या रथयात्रेमधील सदस्य रथ, बॅण्डबाजासहीत शोभायात्रा काढत असताना अनेकजण रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांची ही अनोखी शोभायात्रा पाहत होते. किन्नर रस्त्यावर भजनांबरोबरच डीजेच्या गाण्यावर नाचत होते.

मध्य प्रदेशमधील विदिशामध्ये काढण्यात आलेल्या या शोभायात्रेला सुरक्षा पुरवण्यासाठी २४ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले. तसेच काही खासगी बाऊन्सरही या शोभायात्रेला सुरक्षा पुरवण्यासाठी तैनात करण्यात आलेले. विदिशामध्ये १५ ते २४ डिसेंबरदरम्यान मंगलामुखी किन्नर समाजाचं राष्ट्रीय संम्मेलन आयोजित करण्यात आलेलं. कार्यक्रम शहरातील विनायक वैकूंट हॉसमध्ये आयोजित करण्यात आलेला. याच पार्श्वभूमीवर ही शोभायात्रा काढण्यात आलेली. या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून किन्नर शहरात दाखल झाले होते.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Thane, passenger Thane railway station, train and platform,
VIDEO : रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीत सापडलेल्या प्रवाशाला आरपीएफच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Mumbai Airport Ganja, Ganja seized, Mumbai, Ganja,
मुंबई : विमानतळावरून साडेपाच कोटींचा गांजा जप्त, आरोपीला अटक
Technical work Sindhi railway station, trains cancelled,
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ ९ रेल्वे रद्द…
woman risked her life to make a reel on train track shocking video goes viral
तरुणी रेल्वे रुळावर रील बनवण्यात मग्न, ट्रेन आल्याचंही भान राहिलं नाही अन्…; VIDEO चा शेवट पाहून तुम्हालाही येईल संताप

या कार्यक्रमाचा भाग म्हणून मंगळवारी किन्नरांच्या गुरु सुरैया अगदी शाही थाटामध्ये रथात बसून शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. सुरैया यांच्या गळ्यात, हातात, दंडांवर सोन्याचे दागिने होते. याशिवाय त्यांच्या डोक्यावर सोन्याचं मुकुटही होतं. या सर्व सोन्याचं वजन १० किलो होतं. म्हणजेच सुरैया यांच्या अंगावर तब्बल पाच कोटींचे दागिने होते. सुरैया यांना सुरक्षा पुरवण्यासाठी बाऊन्सर्स तैनात करण्यात आलेले.

याच शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी सागर येथील रुबी या स्वत:च्या गाडीमधून आलेल्या. त्यांच्याकडील दागिने हे १०० वर्षे जुने होते. त्यांच्यासोबत आलेल्या गोलू नायक यांनी एक किलो वजनाचे सोन्याचे कडे घातले होते. संपूर्ण जगाचं कल्याण होवो आणि सर्वकाही सुरळीत असावं यासाठी प्रार्थना करण्यात आलीय. या कार्यक्रमामध्ये कलशयात्रेचेही आयोजन करण्यात आलेलं.

Story img Loader