मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काहींनी याला देशातील शेतकऱ्यांविषयीची प्रशासनाची टोकाची असंवेदनशीलता म्हटलं आहे, काहींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केलं जाणारं दुर्लक्ष म्हटलंय तर काहींनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी प्रशासनाला लक्ष द्यायला भाग पाडणारी शेतकऱ्याची ही अजब कृती कौतुकास्पद ठरली आहे. कारण मंदसौर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वी एक शेतकरी अचानक जमिनीवर झोपला आणि गडाबडा लोळत रडू लागला!

नेमकं घडलं काय?

या शेतकऱ्याचं नाव आहे शंकरलाल पाटीदार. मंदसौर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं काय घडलं, यासंदर्भात इंडिया टुडेनं वृत्त दिलं आहे. शेतकरी शंकरलाल पाटीदार यांची अशी तक्रार होती की एक माफिया त्यांच्या शेतजमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आपली शेतजमीन जर या माफियानं बळकावली, तर आपण आणि आपल्या शेतकरी कुटुंबानं काय करायचं? असा त्यांचा अत्यंत मूलभूत असा प्रश्न होता. पण प्रशासकीय यंत्रणेकडे वारंवार तक्रार करुनदेखील शंकरलाल यांच्या हाती काही यश लागलं नाही.

Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी
Farmer Viral Video
शेतकऱ्यांनो तुम्हीही कांद्याचं पिकं घेतलंय का? वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्
Haryana security personnel stopped the farmers march at the Shambhu border of Punjab-Haryana
शेतकरी मोर्चा एक दिवस स्थगित; शंभू सीमेवर रोखले
Farmers at their protest site at Shambhu border, in Patiala district, Punjab, Saturday,
Farmer Protest : पुन्हा चलो दिल्लीचा नारा, शेतकरी शंभू सीमेवरून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार; पंजाब- हरियाणा मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली!

अनेकदा या सर्व प्रकरणासंदर्भात तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अखेर शंकरलाल पाटीदार हतबल झाले. त्यांनी थेट मंदसौरचं जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच जाब विचारावा, या हेतूनं ते निघाले. पण त्यांना बराच वेळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटूच न दिल्यामुळे त्यांचा उद्वेग वाढला.

कर्मचाऱ्यांना कळेचना, नेमकं झालंय काय!

दरम्यान, कुणीच आपल्या तक्रारीची दखल घेत नाही हे पाहून शेवटी शंकरलाल थेट कार्यालयाच्या व्हरांड्यातील जमिनीवरच झोपले आणि गडाबडा लोळत गोल गोल फिरत ओरडू लागले. “आमचं कुणीही ऐकत नाही, आता आम्ही काय करायचं” असा प्रश्न ते वारंवार रडत विचारू लागले. आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना काय घडतंय हे लक्षात येईपर्यंत शंकरलाल किमान १० ते १५ फूट असेच ओरडत, गोल गोल फिरत पोहोचले होते. शेवटी त्यांना कर्मचाऱ्यांनी हात देऊ उठवून उभं केलं.

जमीन तर शंकरलाल यांच्याच नावावर!

कर्मचाऱ्यांनी शंकरलाल यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सार्वजनिक सुनावणी बैठकीमध्ये नेलं. तिथे शंकरलाल यांनी त्यांची व्यथा मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने त्यांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ज्या जमिनीबाबत शंकरलाल यांना माफियाची भीती वाटत होती, ती जमीन त्यांच्याच नावे असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. एवढंच नव्हे, तर जी जमीन त्यांच्या नावावर नाही, त्या जमिनीवरही सध्या त्यांचाच ताबा असल्याचंही त्यांनी सांगितलं!

शंकरलाल पाटीदार व संपत बाई यांच्या नावावर एकूण ३.५२ हेक्टर जमीन आहे. हे दोघे या जमिनीचे समान हिस्सेदार होते. २०१० मध्ये संपत बाई यांनी ही जमीन अश्विन नावाच्या एका व्यक्तीला विकली. पण अश्विन यांनी या जमिनीचा ताबा घेतलाच नाही. त्यामुळे सध्या स्वत:च्या मालकीच्या जमिनीबरोबरच शंकरलाल यांच्याकडे संपत बाई यांनी अश्विन यांना विकलेल्या जमिनीचाही ताबा आहे.

धोतर घातलं म्हणून वयोवृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIDEO VIRAL होताच घडली जन्माची अद्दल, पाहा नेमकं काय झालं?

काँग्रेसचं भाजपावर टीकास्र

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनं सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करायला सुरुवात केली. अधिकृत एक्स हँडलवर काँग्रेसनं हा व्हिडीओ शेअर करून सरकारवर टीका केली. “हा व्हिडीओ मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे काय हाल झाले आहेत हेच दर्शवत आहे. एक हतबल शेतकरी सरकारी कार्यालयांमध्ये फिरत राहिला पण त्याचं कुठेच ऐकलं गेलं नाही. कुठे लाच मागितली गेली तर कुठे सुनावणी न करताच पळवून लावलं गेलं. शेवटी कंटाळून त्या शेतकऱ्याला हे पाऊल उचलावं लागलं. भाजपा नरेंद्र मोदी शेतकरीविरोधी आहेत हे तर जगजाहीर आहे, आज ते पुन्हा एकदा सिद्ध झालं”, असं काँग्रेसनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader