बलात्काऱ्यांना सार्वजिनकपणे फासावर लटकवलं पाहिजे, जेणेकरुन इतरांपर्यंत संदेश जाईल आणि कोणीही असा गुन्हा करण्याचा विचार करणार नाही असं विधान मध्य प्रदेशातील भाजपा नेत्या उषा ठाकूर यांनी केलं आहे. खांडवा जिल्ह्यात एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर उषा ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“मध्य प्रदेश सरकार अशा क्रूर घटकांचा कठोरपणे सामना करत आहे. बलात्काऱ्यांना फाशीची तरतूद असणारं हे पहिलं राज्य आहे. आतापर्यंत अशा ७२ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे,” अशी माहिती पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

पण तरीही अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असतील तर मग हा आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. “आपल्याला विविध माध्यमातून समाजाचं प्रबोधन करायचं आहे. पण कोणीही अशा प्रकारची घृण कृत्य कसं काय करु शकतं? मी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे अशा गुन्हेदारांना भरचौकात फाशी द्यावी अशी विनंती करणार आहे. आरोपीला जेलमध्ये फाशीची शिक्षा दिली जाते, पण ती कुठे दिली जाते हे कोणालाच माहिती नसतं,” असं त्यांनी म्हटलं.

”जर नुकत्याच झालेल्या बलात्कार प्रकरणांमधील दोन आरोपींना सार्वजनिकपणे फासावर लटकवलं तर इतर कोणीही असा गुन्हा विचार करताना हजार वेळा विचार करेल,” असं उषा ठाकूर म्हणाल्या आहेत. खांडवा येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. सोमवारी बेशुद्ध अवस्थेत ती शेतात आढळली होती. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Story img Loader