लोकसभा निवडणूकीत एकहाती सत्ता मिळवून नवा राजकीय इतिहास घडविणारे भारताचे पंधरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनचरित्रातील काही महत्वाचे प्रसंग वेचून त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा इरादा मध्यप्रदेश सरकारचा आहे.
इयत्ता चौथी ते सहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारीत धड्यांचा समावेश करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री परास जैन यांनी घेतला असल्याचे समजते. याबद्दल पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “आतापर्यंत पारंपारिकरित्या विद्यार्थ्यांना महान राजे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे धडे शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळत आले आहेत.पण, आम्ही आता नरेंद्र मोदींवर आधारीत धड्यांचा समावेश करण्याचा विचार करत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना यातून एका जिंवत प्रतिकाची प्रेरणा मिळेल आणि मोदींचे जीवन प्ररेणादायी असल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे एका गरिब घरात जन्मलेला मुलगाही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो याचेही उदाहरण विद्यार्थ्यांना मिळेल.” असेही जैन म्हणाले.
मोदींचा धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेण्याच्या निर्णयावर अजून मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे शिक्कामोर्तब झालेले नाही. परंतु, शालेय शिक्षण मंत्री परास जैन यांनी याला हिरवा कंदील दिला असून देशातील कोणताही व्यक्ती स्वत:च्या कर्तृत्वावर आणि स्व: अधिकारवर देशाच्या महत्वाच्या पदावर काम करू शकतो याची प्रेरणा युवकांना मिळेल असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा