मध्य प्रदेशमधील रीवा येथे एक विमान दुर्घटना घडली असून यामध्ये एका पायलटचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा पायलट जखमी असल्याची माहिती मिळत आहे. रीवाचे पोलीस अधिक्षक नवनीत भसीन यांनी या दुर्घटनेची माहिती देताना सांगितले की, रीवा जिल्यात प्रशिक्षणार्थी विमान मंदिराच्या कळसाला जाऊन धडकले आणि त्यात विमान दुर्घटना घडली. यात पायलट कॅप्टन विमल कुमार, वय ५४ यांचा मृत्यू झाला आहे. ते बिहारमधील पटना येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार एका खासगी प्रशिक्षण कंपनीचे हे विमान मंदिराचा कळस आणि वीजेच्या तारा यांना धडकून अपघातग्रस्त झाले. ही घटना चौरहाटा ठाण्याजवळील उमरी गावातील मंदिरानजीक घडली. अपघात झाल्यानतंर एका पायलटचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा पायलट गंभीर जखमी असल्याचे कळते. जखमीस संजय गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघातात विमानाच्या पंखाचा चक्काचूर झाला, त्यावरुन या अपघाताची दाहकता समजून येते.
रीवा चोरहाटा हवाई पट्टीच्या नजीक ५ जानेवारी रोजीच्या रात्री जवळपास ११.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रीवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनोज पुष्प आणि पोलिस अधीक्षक नवनीत भसीन यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले.
खराब वातावरणामुळे अपघात झाल्याचा अंदाज
प्रदूषित वातावरणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रिवाच्या चोरहाटा विमानतळानजीक पाल्टन एव्हीएशन अॅकडमीचे विमानाने रात्री उड्डाण घेतले होते. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास विमान आधी झाडाला धडकले आणि त्यानंतर जाऊन विमानाच्या कळसावर जाऊन आदळले. ही धडक इतकी जोरदार होती की, विमानाचा चक्काचूर झाला. अपघात होताच एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला. या आवाजामुळे स्थानिक गावकरी घटनास्थळी जमा झाले आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.