देशात गेल्या काही दिवसांपासून हिजाबवरून राजकारण पेटलं आहे. यावरून भिन्न मतसरणी असलेली मंडळी आमनेसामने आली आहेत. राजकीय पक्षांना तर राजकारण करण्याची आयती संधी मिळाली आहे. कर्नाटकात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुरखा घातलेली एक महिला मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. राजस्थानच्या या महिला भक्ताने ‘जिन्न’च्या सांगण्यावरून बुरखा घालून मंदिरात आल्याचे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले.यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलेने दर्शन घेतलं.
राजस्थानच्या भिलवाडा येथे राहणारी लक्ष्मी नावाची महिला तिचे नातेवाईक किशन, वडील दालचंद आणि आईसह उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी आली होती. साधारणपणे महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविक साडी किंवा सलवार सूटमध्ये दिसतात. गुरुवारी राजस्थानमधील ही महिला बुरखा घालून आली तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महिलेची चौकशी केल्यानंतर एका महिला पोलिसाला दर्शनासाठी तिच्यासोबत पाठवण्यात आले.
“भाजपा मला ‘मौन मोहन’ म्हणायची; पण आता…,” मनमोहन सिंग यांनी सुनावलं; मोदींवरही तीव्र शब्दांत टीका
याप्रकरणी महाकाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी मुनेंद्र गौतम यांनी सांगितले की, “बुरखा घातलेली एक महिला मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिची तपासणी केली. दर्शन घेतल्यानंतर तिला आणि तिच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.” पोलिसांनी महिलेला बुरखा घालण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की, ‘जिन्न’चा असा आदेश होता, त्यामुळे बुरखा घालून मंदिरात आली होती. त्याचवेळी महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. उज्जैनमधील महाकाल मंदिरात जाण्यासाठी ही महिला बऱ्याच दिवसांपासून बुरखा घालण्याचा आग्रह करत होती, असे त्यांनी सांगितले. तिच्या हट्टामुळे गुरुवारी नातेवाईक महिलेसह मंदिरात आले होते. आधारकार्डवरून महिलेची ओळख पटल्यानंतर तिला परत पाठवण्यात आले.