माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
राजीव गांधी यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेले टी. सुदेंथेंदराजा ऊर्फ संथन, व्ही. श्रीहरन ऊर्फ मुरुगन आणि ए. जी. पेरारीवलन यांचा हत्येत सहभाग नव्हता, त्यामुळे या घटनेचा पुन्हा तपास झाल्यास त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असे प्रतिपादन व्ही. शांतकुमारेसन या याचिकाकर्त्यां वकिलाने केली होती. या तिघांना पूर्वी सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत परावर्तित केली होती. अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या जायला हव्यात, असा सल्ला देऊन मुख्य न्यायाधीश न्या. संजय किशन कौल व न्या. एस. मणिकुमार यांच्या पीठाने ही याचिका फेटाळून लावली.
राजीव हत्या : फेरतपासाची मागणी अमान्य
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
First published on: 18-04-2015 at 02:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madras hc dismisses plea seeking reinvestigation into rajiv gandhi assassination