दिल्लीपाठोपाठ उत्तराखंड, गुजरात, काश्मीर व तामिळनाडूमध्ये मॅगी नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे, तर नेपाळने भारतातून आयात केलेल्या मॅगीच्या नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर बिग बाजारपाठोपाठ वॉलमार्ट व मेट्रो यांनीही मॅगीची विक्री बंद केली आहे. यामुळे नेस्ले भारतामध्ये कमालीची अडचणीत आली असून, उर्वरित राज्येही बंदी घालण्याचा विचार करत आहेत. मॅगीच्या मसाल्यात मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक आढळल्याने बुधवारी रात्री उशिरा उत्तराखंडमध्ये तीन महिन्याची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तर लोकांचे आरोग्य लक्षात घेऊनच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश यांनी सांगितले. गुरुवारी गुजरातमध्येही मॅगीवर एक महिन्याची बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला. याचबरोबर तामिळनाडू सरकारनेही राज्यामध्ये मॅगीवर तीन महिन्यांची बंदी व जम्मू आणि काश्मीर सरकारनेही एक महिन्याची बंदी घातली आहे.
सदिच्छादूतांना नोटिसा
मॅगीचा दर्जा व सुरक्षेबाबत जाहिरातीतून खोटी माहिती देऊन लोकांना ती खाण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तामिळनाडू ग्राहक मंचाने अभिनेता अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित व प्रीती झिंटा यांना नोटीस पाठविली आहे. ग्राहक हक्क कार्यकर्ते के. मनवालन यांनी याबाबत तक्रार केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा