दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मॅगीप्रेमींसाठी खुशखबर आहे. गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून बाजारातून ‘गायब’ असलेले मॅगी नूडल्स सोमवारपासून पुन्हा उपलब्ध होणार असल्याचे नेसले कंपनीकडून जाहीर करण्यात आले. किरकोळ दुकानांसोबतच मॅगी आता ऑनलाईनही उपलब्ध होणार असून, त्यासाठी नेसलेने स्नॅपडीलसोबत करार केला आहे.
नेसले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी म्हटले आहे की, मॅगी ही कायम ग्राहकांच्याच आवडीची आणि हक्काची राहिली आहे. वर्षानुवर्षे ग्राहकांच्या जिभेवर रेंगाळणारी मॅगीची चव त्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा उपलब्ध करून देताना आम्हाला अत्यानंद होतो आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये मॅगीच्या विक्रीवर कोणतेही बंधन नाही. मात्र, ज्या राज्यांमध्ये असे बंधन घालण्यात आले आहे. तिथे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच त्या राज्यांमध्येही मॅगी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असे नेसलेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या कर्नाटक, पंजाब आणि गोवामध्ये मॅगीचे उत्पादन केले जाते.

Story img Loader