उत्तर जपानला रविवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ६ रिश्टर स्केल इतकी होती. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच या भूकंपानंतर सुनामी येण्याचा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात शासकीय स्तरावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
उत्तर जपानच्या ओमोरी भागामध्ये रविवारी भूकंपाचा धक्काबसला. हे ठिकाण  टोकियोच्या ईशान्येस ६०० किलोमीटर अंतरावर आहे. जपानमध्ये दरवर्षी मोठय़ा प्रमाणात भूकंपाचे धक्केबसतात. मात्र येथील बांधकामे इतर देशांच्या वास्तुरचनेच्या तुलनेत मजबूत बांधण्यात येत असल्याने मोठय़ा प्रमाणात हानी होत नाही. मे महिन्यामध्ये टोकियोत झालेल्या भूकंपामध्ये १७ नागरिक जखमी झाले होते.

Story img Loader