भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये आतापर्यंत ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. thejakartapost ने दिलेल्या वृत्तानुसार रिश्टर स्केलवर ६.९ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. लोम्बोक आयलँडजवळ उत्तर भागातल्या जमिनीच्या 10.5 किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, ते बाली द्विपसमूहापर्यंत जाणवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भूकंपाच्या धक्क्यांनंतर इंडोनेशिया आणि आसपासच्या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, पण आता धोका टळल्याची माहिती देण्यात आली आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका लोम्बोक शहराला बसला असून येथे मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. भूकंपानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि ते रस्त्यावर आले, अनेक घरांचं नुकसान झालं असून बरीच घरं उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीही इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लोम्बोक येथे ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ३० जुलै रोजी झालेल्या या भूकंपात काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये १४ लोकांनी प्राण गमावले होते. तर जवळपास १६० लोक जखमी झाले होते. त्यावेळी झालेल्या भूकंपाने १ हजारहून अधिक घरे उध्वस्थ झाली होती. मागील आठवड्यात झालेल्या भूकंपाच्या झटक्यांमुळे डोंगर उतारावरील माती मोठ्या प्रमाणावर घसरून खाली आली होती. यावेळी अनेक ठिकाणी जमीनही धसली होती. त्यामुळे ट्रेकला गेलेले ट्रेकर्स आणि त्यांचे वाटाडे असे हजारहून अधिकजण अडकून पडले होते. डोंगरावर जाणारा रस्ता बंद झाल्याने हे अडकल्याची माहिती येथील स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली होती. अडकलेल्यांपैकी ७२३ ट्रेकर्स हे परदेशी असल्याची माहितीही देण्यात आली होती. या सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.