१३ जानेवारीपासून महाकुंभ सुरू झाल्यापासून ४८ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रयागराजला ट्रेनने प्रवास केला आहे. उद्या, २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्या आहे. या दिवशी पवित्र स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यासाठीही रेल्वेने खास अतिरिक्त तयारी केली आहे. इंडियन एक्स्प्रसेने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मौनी अमावस्येला १० टक्के लोक रेल्वेने प्रवास करणार

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, २६ जानेवारीपर्यंत प्रयागराजमधील नऊ स्थानकांवर प्रवास करणाऱ्या ४८.७ लाख प्रवाशांपैकी सर्वाधिक म्हणजे १३.८७ लाख प्रवासी १४ जानेवारीला मकरसंक्रांतीला गेले होते. मकर संक्रांत हा कुंभातील मुख्य स्नान दिवसांपैकी एक आहे. आणखी एक महत्त्वाचा स्नान दिवस म्हणजे २९ जानेवारी रोजी येणारी मौनी अमावस्या. या दिवशी सुमारे १० कोटी यात्रेकरूंनी त्रिवेणी संगमात स्नान करणे अपेक्षित आहे, त्यापैकी सुमारे १० टक्के रेल्वेने प्रवास करतील.

नऊ स्थानकांवरील ट्रेन फेऱ्या वाढवणार

प्रयागराज रेल्वे विभागाने प्रयागराज जंक्शन, सुभेदारगंज, नैनी, प्रयागराज छेओकी, प्रयाग जंक्शन, फाफामौ, प्रयागराज रामबाग, प्रयागराज संगम आणि झुंसी या नऊ स्थानकांवरून दिवसभरात १५० हून अधिक विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली आहे. दर चार मिनिटांनी एक ट्रेन येथून सोडण्यात येणार आहे. अर्धकुंभ २०१९9 दरम्यान रेल्वेने भाविकांसाठी ८५ गाड्या चालवल्या होत्या.

प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी, अनारक्षित प्रवाशांसाठी सर्व स्थानकांवर रंग-कोडेड निवारे उभारण्यात आले आहेत. हे आश्रयस्थान प्रवाशांच्या गंतव्य स्थानांवर आधारित आहेत, प्रत्येक रंग विशिष्ट मार्गांशी संबंधित आहे.

अतिरिक्त तिकिट काऊंटरची व्यवस्था

एकूणच, प्रवाशांचा प्रचंड प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी, अनारक्षित तिकीट प्रणाली, स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीन, चौकशी आणि प्रवासी आरक्षण प्रणालीसह ५६० तिकीट पॉइंट्सची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी १३२ काउंटर प्रयागराज जंक्शन येथे आहेत, जिथे दररोज सुमारे १० लाख तिकिटे वितरित केली जाऊ शकतात. उत्तर प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार , महाकुंभला आतापर्यंत १३ कोटींहून अधिक भाविक आले आहेत.