When is Prayagraj Maha kumbh Mela 2025: उत्तर प्रदेशमध्ये महा कुंभ मेळ्याची जोरदार तयारी सध्या पाहायला मिळत आहे. १२ वर्षांपूर्वी प्रयागराज जिल्हा व्यवस्थापनाकडून या महा कुंभ मेळ्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण यावेळी या कुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याचीच घोषणा करण्यात आली आहे. या जिल्ह्याचं नावदेखील ‘महा कुंभ मेळा’ असंच करण्यात आलं आहे. या जिल्ह्याचं व्यवस्थापन कुंभ मेळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांकडूनच केलं जाणार आहे.

तब्बल १२ वर्षांनी एकदा होणाऱ्या या महा कुंभ मेळ्याची फक्त भारतातीलच नव्हे, तर विदेशातीलही भाविक मोठ्या आतुरतेनं वाट पाहात असतात. कोट्यवधी भाविक या कुंभ मेळ्याला हजेरी लावत असतात. १२ वर्षांपूर्वी झालेल्या मेळाव्याला काही कोटी भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळीही ही संख्या तब्बल १० कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या काळात सुरक्षा व्यवस्थेसाठीही चोख बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?

कधी होणार महा कुंभ मेळा?

पुढील वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात यंदाचा महा कुंभ मेळा होणार आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असा ४४ दिवस महा कुंभ मेळा चालणार आहे. यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला महा कुंभ मेळा जिल्हा जवळपास ६ हेक्टर परिसरामध्ये उभारण्यात येत आहे. त्यातील ४ हजार हेक्टरमध्ये प्रत्यक्ष कुंभ मेळ्याचं आयोजन होईल, तर १९०० हेक्टर परिसरामध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सुरक्षेची चोख उपाययोजना

महा कुंभ मेळा म्हणजे शाही स्नान हे समीकरण भाविकांसाठी ठरलेलंच आहे. शाही स्नानाला मोठं महत्त्व असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या काळात गंगा नदीवर लाखोंच्या संख्येनं भाविक शाही स्नान करतात. अशावेळी कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांसोबतच अंडरवॉटर ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हे ड्रोन ३०० मीटरपर्यंतच्या खोलीवरचा माग काढू शकतात.

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा; योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय!

शाही स्नानासाठी महत्त्वाच्या तारखा…

प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महा कुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या तारखांवेळी जास्त गर्दी होणार हे गृहीत धरून त्यानुसार व्यवस्थापन व सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

१. १३ जानेवारी २०२५ – पौष पौर्णिमा
२. १४ जानेवारी २०२५ – मकर संक्रात
३. २९ जानेवारी २०२५ – मौनी अमावस्या (सोमवती)
४. ३ फेब्रुवारी २०२५ – वसंत पंचमी
५. १२ फेब्रुवारी २०२५ – माघी पौर्णिमा
६. २६ फेब्रुवारी २०२५ – महाशिवरात्र

माहितीसाठी कुठे संपर्क करायचा?

अतिरिक्त माहितीसाठी प्रयागराज जिल्हा व्यवस्थापनानं संपर्क व्यवस्था सुरू केली असून त्यात फोन नंबरदेखील देण्यात आले आहेत. त्यानुसार ०५३२२५०४०११ व १५३२२५००७७५ हे दोन क्रमांक प्रयागराज जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत.