Police Officer mixes ash in food for devotees Viral Video : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे यंदा महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आला आहे. या कुंभमेळ्याला जगभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान भाविकांच्या भंडाऱ्यात राख टाकल्याच्या आरोपावरून प्रयागराज येथील सोराव पोलीस ठाण्यातील स्टेशन हाऊस ऑफिसर ब्रिजेश तिवारी यांना गुरूवारी रात्री निलंबित करण्यात आले आहे. हा भंडारा भाविकांसाठी आयोजित करण्यात आला होता. शिजवलेल्या अन्नाच्या भांड्यात पोलीस अधिकारी राख टाकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडाऱ्याचे आयोजन पोलिसांची परवानगी न घेता केल्याच्या रागातून आरोपी पोलिसांने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रयागराज पोलीसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबद्दल माहिती मिळली, त्यानंतर याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) सोराव यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता. त्यांच्या प्राथमिक अहवालात त्यांनी एसएचओ दोषी आढळून आल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त ट्रान्स गंगा, कुलदीप सिंग यांनी एसएचओच्या निलंबनाचे आदेश दिले. डिसीपींनी देखील एसीपींना या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, भावापूर टोल प्लाझा जवळ भाविकांसाठी हे अन्न शिजवले जात होते, येथेच पोलिसांनी प्रयागराजकडे जाणाऱ्या अनेक वाहनांना रोखले होते. यादरन्यान अनेक भाविक उपाशी पोटी संगमाकडे चालत जात असल्याचे पाहून स्थानकांनी त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अन्न शिजवण्याचे काम सुरू होते.

पण एसएचओने त्यांना जागा रिकामी करण्यास सांगितले, पण स्थानिक नागरिकांनी तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर एसएचओने अन्न शिजवले जात असलेल्या भांड्यांमध्ये राख टाकल्याचा आरोप आहे.