Last Day of Mahakumbh Mela 2025 Mahashivratri LIVE Updates : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा आज ४५ वा आणि अखेरचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी कुंभ मेळ्यात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी संगमावर हजारो लोक शाही स्नान करण्यासाठी दाखल झाले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत ७० लाखांहून अधिक लोकांनी शाही स्नान केल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. प्रशासनाने सकाळी भाविकांवर पुष्पवृष्टी देखील केली. यामुळे भाविकांना सुखद धक्का बसला. आज दोन कोटी भाविक प्रयागराजमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारवर मोठी जबाबदारी असेल. योगी सरकार दोन कोटी लोकांची व्यवस्था कशा पद्धतीने करतंय याकडे सर्वांचं लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Prayagraj Mahakumbh Mela 2025 LIVE Updates : कुंभ मेळ्यातील अखेरच्या दिवशी घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

16:02 (IST) 26 Feb 2025

दुपारी ३ वाजेपर्यंत सव्वा कोटी भाविकांचं शाही स्नान

दुपारी ३ वाजेपर्यंत सव्वा कोटी भाविकांनी शाही स्नान केलं. शेवटच्या दिवशी अनेक बॉलिवूड कलाकार व राजकीय नेत्यांनी संगमावर जाऊन स्नान केलं.

14:44 (IST) 26 Feb 2025

भारतीय हवाई दलाचा एअर शो

भारतीय वायूदलाने महाकुंभ मेळ्याच्या शेवटच्या दिवशी प्रयागराजमध्ये एअर शोचे आयोजन केले होते.

14:27 (IST) 26 Feb 2025

Mahakumbh Mela 2025 – दुपारी २ वाजेपर्यंत १ कोटी लोकांची शाही स्नान

दुपारी दोन वाजेपर्यंत १ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर जाऊन शाही स्नान केलं. आज दिवसभरात दोन कोटी भाविक महाकुंभ मेळ्याल्या भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

13:33 (IST) 26 Feb 2025

ओयोचे संस्धापक रितेश अग्रवाल यांनी देखील शेवटच्या दिवशी महाकुंभ मेळ्याला भेट दिली

13:27 (IST) 26 Feb 2025

भाविकांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

https://twitter.com/MahaaKumbh/status/1894651625874076079

12:58 (IST) 26 Feb 2025
ब्रिटीश-भारतीय अभिनेत्री फागून ठकरार महाकुंभ मेळ्यात सहभागी

12:55 (IST) 26 Feb 2025
योगी आदित्यनाथ यांच्याकडून महाकुंभ मेळ्याचा आढावा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कुंभ मेळ्याच्या आयोजनावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी महाकुंभ मेळ्याचा आढावा घेतला

12:53 (IST) 26 Feb 2025

प्रिती झिंटाने शेअर केला महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ

12:52 (IST) 26 Feb 2025

दुपारी १२ वाजेपर्यंत ८१ लाख लोकांनी केलं शाही स्नान

अखेरच्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत ८१ लाख भाविकांनी त्रिवेणी संगमावर जाऊन शाही स्नान केलं.

12:09 (IST) 26 Feb 2025

Mahakumbh 2025 Live Updates: प्रयागराजमध्ये दाखल झालेली प्रिती झिंटा भावूक

महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करण्यासाठी आलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा संगमावरील वातावरण पाहून भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

12:07 (IST) 26 Feb 2025

Mahakumbh 2025 Live Updates: महाकुंभ मेळ्यासाठी आलेल्या भाविकांसाठी ११५ रेल्वे गाड्या

महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ११५ रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या.