Mahakumbh Mela 2025 Basant Panchami : मौनी अमावस्येनिमित्त अमृतस्नान करण्यासाठी गेलेल्या काही भाविकांवर काळाचा घाला झाला. बॅरिकेट्स तुटून झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास ३० भाविक मृत्यू तर ६० हून अधिक भाविक जखमी झाले होते. मौनी अमावस्येचा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, त्याच दिवशी ऐतिहासिक अशा महाकुंभमेळ्याच्या सोहळ्याला गालबोट लागल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. दरम्यान, आज वसंत पंचमीनिमित्त पुन्हा अमृतस्नान होते. त्यामुळे आजच्या सोहळ्याकडे उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र, सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने चोख व्यवस्था केली असल्याचं समाधान भाविकांनी आणि साधूंनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसंत पंचमीनिमित्त तिसऱ्या अमृत स्नानची सुरुवात करून सोमवारी पहाटे ४ वाजेपर्यंत १४ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. नागा साधूंनी घाटांवर अमृतस्नानाची सुरुवात केली. श्रद्धा आणि भक्तीने त्रिवेणीचा किनारा प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरांचा साक्षीदार आहे, असं महाकुंभ प्रशासनाने एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.

व्यवस्थापन आणि नियोजनाचं कौतुक

१३ जानेवारीला महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून ३ फेब्रुवारीपर्यंत ३४ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. तर महिनाभर अध्यात्मिक तपस्या करणाऱ्या भक्तांची संख्या १ कोटीहून अधिक आहे. यामुळे अध्यात्मिक उत्साहात भर पडली आहे. दरम्यान सोमवारी पहाटे वसंत पंचमीनिमित्त गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी आणि आई सरस्वतीची प्रार्थन करण्यासाठी प्रयागराज येथे मोठ्या संख्येने भाविक जमले होते. ३ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर पवित्र अमृतस्नान सोहळ्याची तयारी केल्यामुळे प्रयागराज जंक्शनवर भाविकांची मोठी गर्दी जमली होती. उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या चोख व्यवस्थापन आणि नियोजनाची भाविकांकडून कौतुक होत आहे.