Prayagraj Mahakumbh 2025 LIVE Updates : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. येथे भारतातूनच नव्हे तर जगभरातील भाविक पवित्र स्नान करण्यासाठी दाखल होत आहेत. कुंभमेळा प्रशासनाचा दावा आहे की आत्तापर्यंत ५८ कोटीहून अधिक लोकांनी पवित्र गंगेत स्नान केले आहे. आजही हजारो भाविक संगमात स्नान करण्यासाठी प्रयागराजला जात आहे. महाकुंभमेळ्या बद्दलच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण लाईव्ह ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Mahakumbh 2025  Highlights  : महाकुंभमेळ्यासंबंधीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट वाचा एका क्लिकवर

17:23 (IST) 21 Feb 2025

हिंदू जनता ममता बॅनर्जींना धडा शिकवेल, कुंभमेळ्याबद्दलच्या वक्तव्यावरून भाजपा नेत्याची टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा उल्लेख रक्त कुंभ असा केला होता. यावर पश्चिम बंगालचे भाजपाचे दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी यांनी टीका केली आहे. हा वाईट शब्द आहे, हे आम्हाला मान्य नाही. ६० कोटींहून अधिक लोकांनी येथे स्नान केले आहे. सफाई कर्मचारी ते पोलीस कर्मचारी काम करत आहेत. हे सगळं पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले. महाकुंभचा अपमान जनता सहन करणार नाही. हिंदू जनता विधानसभा निवडणूकीत (बंगालच्या) चांगल्या पद्धतीने ममता बॅनर्जी यांना धडा शिकवेल,” असे भाजपा नेते अधिकारी प्रयागराज येथे बोलताना म्हणाले.

16:25 (IST) 21 Feb 2025
“एक हिंदू म्हणून, एक सनातनी म्हणून…”, सुवेंदु अधिकारींनी केलं पीएम मोदी आणि योगींचं कौतुक

“एक हिंदू म्हणून, एक सनातनी म्हणून आणि भारतमातेचा पुत्र म्हणून, ही माझी अमृत प्राप्ती आहे. म्हणूनच ही भूमी आणि संगम ‘अमृत संगम’ आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे हे शक्य झाले…,” अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्यानंतर दिली.

https://platform.twitter.com/widgets.js
16:17 (IST) 21 Feb 2025

महाकुंभमेळा २०२५ कधी समाप्त होणार?

प्रयागराज येथील महाकुंभमेळा महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त होईल. यावर्षी महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. याच दिवशी अखेरचे शाही स्नान होईल.

15:34 (IST) 21 Feb 2025

केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांची कुटुंबासह त्रिवेणी संगमात डुबकी

केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी त्यांच्या कुटुंबासह प्रयागराजमधील महाकुंभ दरम्यान त्रिवेणी संगमात पवित्र स्नान आणि प्रार्थना केली.

14:58 (IST) 21 Feb 2025

आसामचे मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रयागराज येथील पवित्र संगमात डुबकी

कुंभमेळ्यादरम्यान संगमात स्नान करणे हे एक सौभाग्य आहे. ही संधी दिल्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार. कुंभमेळ्याचे खूप यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि युपी प्रशासनाचे आभार मानतो.

14:47 (IST) 21 Feb 2025
भाविकांना प्रयागराजला घेऊन जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात! ६ जण ठार, पाच जण गंभीर

प्रयागराजला भाविकांना घेऊन जाणाऱ्या गाडीला वाराणसीतील मिर्झामुरादजवळ जीटी रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले . मिर्झामुराद पोलीस स्टेशनचे एसएचओ अजय राज वर्मा यांनी सांगितले की, हे सर्व भाविक कर्नाटकचे होते. पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js