Ganga And Kumbh Born At Kumbh Mela Hospital : उत्तर प्रदेशात जानेवारीत सुरू होणाऱ्या महाकुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, प्रयागराजच्या महाकुंभनगरमध्ये उभारण्यात आलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी बाळाने जन्म घेतला. रविवारी एका मुलचा जन्म झाल्यानंतर सोमवारीही आणखी एका मुलीने या रुग्णालयात जन्म घेतला. यावेळी कुटुंबीयांच्या संमतीने मुलीचे नाव ‘गंगा’ तर मुलाचे नाव ‘कुंभ’ ठेवण्यात आले आहे. दरम्यान महाकुंभासाठी येणाऱ्या लाखो लोकांसाठी हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाकुंभमेळ्याच्या परेड परिसरात १०० खाटांचे सेंट्रल हॉस्पिटल ओपीडी, जनरल वॉर्ड, डिलिव्हरी सेंटर, आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर यासारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. या रुग्णालयात लोकांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. पुरुष, महिला आणि मुलांसाठीही स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. हॉस्पिटलमध्ये एक्स-रे, बायोकेमिस्ट्री लॅब आणि अल्ट्रासाऊंड यांसारखी डायग्नोस्टिक सेंटर्स देखील आहेत.

बांदा जिल्ह्यातील शिवकुमारी आणि कौशांबी जिल्ह्यातील सोनम यांनी अनुक्रमे मुलगी आणि मुलाला जन्म दिला.
प्रसूती कळा जाणवू लागल्याने सोनम पती राजासोबत रुग्णालयात आल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. महाकुंभमेळा परिसरात कामाच्या शोधात आलेल्या या दाम्पत्याने रुग्णालयात तातडीने वैद्यकीय मदत मागितली. महिला डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर सोनमला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिची प्रसूती पार पडली.

हे ही वाचा : Manipur Violence : हिंसाचाराच्या मुद्द्यावर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली जाहीर माफी; म्हणाले, “जे काही झालं ते झालं, आता…”

यानंतर सोमवारी प्रसूती कळा जाणवू लागल्याने शिवकुमारी यांना या तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनंतर मुलीला जन्म दिला.

दरम्यान या कुंभमेळ्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात विविध श्रेणीतील एकूण २३१ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या पथकामध्ये सर्जन, फिजिशियन, बालरोगतज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ आणि दंतवैद्य यांचा समावेश आहे. पॅरा-मेडिकल स्टाफचे पथकही या रुग्णालयात तैनात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रिजेश पाठक यांनी दिली.

हे ही वाचा : Richest CM of India: भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांची संपत्ती किती?

१३ जानेवारीपासून कुंभमेळा

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा कुंभमेळा होणार आहे. यामध्ये शाही स्नानांचे महत्त्वाचे दिवस पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि महाशिवरात्री हे असणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh nagar hospital welcomes newborns ganga kumbh aam