Bengaluru Mahalakshmi Murder Case : बंगळुरूमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तब्बल ३० पेक्षा जास्त तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना २१ सप्टेंबर रोजी घडली. खून झालेल्या महिलेचे नाव महालक्ष्मी असं होतं. बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात ही घटना उघडकीस आली होती. महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे करून १६५ लीटरच्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर बंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी काही विशेष पथके तयार केली होती. पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

महालक्ष्मीच्या हत्या प्रकरणाला एक नवं वळण लागलं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. संशयित आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती वृत्तानुसार समोर येत आहे. तसेच या मृतदेहाबरोबर एक सुसाइड नोट आढळून आली असून त्या सुसाइड नोटमध्ये महालक्ष्मीच्या हत्येची कबुली देण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचं नाव मुक्तीरंजन प्रताप राय असं आहे. दरम्यान, महालक्ष्मीच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी आपण केलेल्या कृत्याची माहिती त्याच्या आईला सांगितली होती, असं इंडियन एक्स्प्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

हेही वाचा : Mahalakshmi Murder Case : “महालक्ष्मीवर प्रेम होतं, पण तिने मला…”, बॉयफ्रेंडच्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय?

आरोपीचा मृतदेह ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील भुईनपूर गावाजवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. आरोपी मुक्तीरंजन रायच्या आईने सांगितलं की, “तो मंगळवारी रात्री १० वाजता घरी आला होता. मात्र, तो तणावग्रस्त दिसत होता, म्हणून मी त्याला कारण विचारलं होतं. त्यानंतर त्याने चूक केली असे तो म्हणाला. जेव्हा मी त्याच्यावर दबाव टाकत अधिक माहिती विचारली. तेव्हा त्याने सांगितलं की, बेंगळुरूमध्ये एका महिलेची हत्या केली. जिथे तो उदरनिर्वाहासाठी राहत होता. त्याने असंही सांगितलं की, पीडितेने आरोपीकडून पैसे आणि आणि सोन्याची चैन घेतली होती. त्याने पंधरवाड्यापूर्वीच हा गुन्हा केला होता. मात्र, जेव्हा त्याने मला या घटनेबद्दल सांगितलं तेव्हा मी थक्क झाले. त्यानंतर तो झोपी गेला आणि पहाटे ४ वाजताच्या सुमारास पोलीस तपासामुळे कुटुंबावर परिणाम होऊ नये म्हणून आपण निघून जात असल्याचं सांगितलं. पहाटे तो एक ग्लास पाणी प्यायला आणि निघून गेला”, अशी माहिती आरोपी मुक्तीरंजनच्या ६० वर्षांच्या आईने दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

मुक्तीरंजन रायच्या सुसाईड नोटमध्ये काय?

“मला महालक्ष्मी खूप आवडत होती. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. मात्र, ती माझ्याशी अजिबात नीट वागत नव्हती. महालक्ष्मी मला अपहरणाच्या प्रकरणात अडकवू पाहात होती. मी तिच्यासाठी खूप पैसे खर्च केले. मात्र, तिला माझी कदर नव्हती. त्यामुळे मी तिची हत्या केली.” असं मुक्तीरंजनने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं असल्याची माहिती समोर आली.

Story img Loader