Tea And Juice Shops At Kumbha Mela 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये येत्या १३ जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासन जय्यत तयारी करत आहे. यासह भाविकांमध्येही मोठे उत्साहाचे वातावरण आहे. अशात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत रवींद्र पुरी यांनी, कुंभमेळ्यात इतर धर्मियांना दुकाने लावण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे.

…ते त्यामध्ये थुंकतात

आखाडा परिषदेचे प्रमुख महंत रवींद्र पुरी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, “गैर हिंदू दुकानदारांना प्रयागराजमधील कुंभमेळ्यात चहा, ज्युस आणि फुलांची दुकाने लावण्याची परवानगी देऊ नये. ते त्यामध्ये थुंकतात, लघवी करतात. जर त्यांना परवानगी दिली तर नागा साधूंना जबरदस्तीने यावर कारवाई करावी लागेल.”

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
manoj jarange patil vidhan sabha
मनोज जरांगे यांचा निर्णय लांबणीवर; उत्सुकता ताणली, कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढला
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?

ते पुढे बोलताना म्हणाले की, “जर अशी घटना घडली आणि यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या तर त्यामुळे जगभरात चुकीचा संदेश जाईल. आपला कुंभमेळा सुंदर, स्वच्छ, भव्य-दिव्य आणि शांततामय असावा. कुंभ मेळ्याची सुरक्षा आणि पावित्र्य राखण्यासाठी गैर-हिंदूंना यापासून दूर ठेवण्याची गरज आहे.”

हे ही वाचा : Video: “त्यांची विक्री झाली असती…”, चार बहिणी, आईची हत्या करणाऱ्या अर्शदचा धक्कादायक व्हिडीओ समोर

शाही शब्दाला विरोध

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख असलेल्या महंत रवींद्र पुरी यांनी यापूर्वीही कुंभमेळ्यात मुस्लिम विक्रेत्यांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. अखिल भारतीय आखाडा परिषदेने कुंभ मेळ्यात “गैरसनातनींना” खाद्यपदार्थांचे स्टॉल लावू न देण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर ‘शाही स्नान’ आणि ‘पेशवाई’ या शब्दांचे नाव बदलून ‘राजसी स्नान’ आणि ‘छावणी प्रवेश’ ठेवण्याचा निर्णयही घेतला होता.

याबाबत बोलताना रवींद्र पुरी म्हणाले होते की, “शाही हा उर्दू शब्द आहे. असे असले तरी आम्हाला उर्दूचा अजिबात तिरस्कार नाही. उर्दू आणि हिंदीचा जवळचा संबंध आहे. पण, जेव्हा धर्म, परंपरा किंवा संस्कृतीचा विचार केला जातो तेव्हा आमचा प्रयत्न नेहमीच संस्कृत किंवा हिंदी भाषेतील शब्द जास्तीत जास्त वापरण्याचा असेल, कारण ते अधिक योग्य आहेत.”

हे ही वाचा : विद्यार्थीनीवर बलात्कार करत फोटो केले होते व्हायरल, नराधम शिक्षकाला १११ वर्षांचा कारावास

मंदीर आणि मशीद वादावरही भाष्य

यावेळी रवींद्र पुरी यांनी संभलमधील मंदीर आणि मशीद वादावरही प्रतिक्रिया दिला आहे. आयएएनएसशी बोलताना ते म्हणाले की, “हा प्रश्न फक्त संभलचा नाही. संपूर्ण भारतात तुम्ही कुठेही जा, ज्या ठिकाणावर सध्या मशीद आहे तिथे पूर्वी मंदिर होते.”

Story img Loader