२२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जाणार आहे. कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सगळा देश राममय झाला आहे असं भाजपाचे नेते म्हणत आहेत. तसंच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झालेले साधू-संतही हेच म्हणत आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या दिवशी संध्याकाळी दिवाळी साजरी करण्याचं आणि रामज्योती प्रज्वलित करण्याचं आवाहन केलं. आता राजस्थानाच्या राजघराण्यातले पद्मनाभ सिंह यांनी दावा केला आहे की आम्ही प्रभू रामाचे वंशज आहोत. त्यासाठी त्यांनी वंशावळही दाखवली आहे.
प्रभू रामाचे वंशज असल्याचा पद्मनाभ सिंह यांचा दावा
राजस्थानच्या ‘सूर्यवंशी राजपूत’ नावाच्या शाही घराण्याने रामाच्या अस्तित्वाचा दावा तर केलाच आहे. शिवाय वंशावळ दाखवली आहे आम्ही रामाचे वंशज आहोत असा दावा केला आहे. जी वंशावळ पद्मनाभ सिंह यांनी पोस्ट केली आहे त्या पोस्टमध्ये प्रभू रामाचं आणि महाराज दशरथांचं नावही दाखवलं आहे. इतिहासकारांनीही हा दावा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे की आम्ही रामाचे वंशज आहोत. राजस्थानच्या मेवाड मधलं महाराजा सवाई पद्मनाभ सिंह यांचं घराणं हे रामाचं घराणं असल्याचं इतिहासकार म्हणाल्याचंही जयपूरचे महाराजा सवाई पद्मनाभ सिंह यांनी म्हटलं आहे. इतिहासकारांनी म्हटलं आहे की पद्मनाभ सिंह यांचं घराणं शिवभक्त आणि सूर्यवंशी आहे त्यामुळे ते प्रभू रामाचे वंशज आहेत.
सवाई पद्मनाभ सिंह प्रसिद्ध खेळाडू आहेत
महाराज सवाई पद्मनाभ सिंह हे भारतातले प्रसिद्ध खेळाडू आहेत. अमजेरच्या मेयो महाविद्यालयात आणि इंग्लंडच्या समरसेट स्ट्रीटच्या पब्लिक स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांची आजी राजमाता पद्मिनी देवी यांनी पद्मनाभ सिंह यांचं नाव दिलं आहे. राजघराण्याचे पद्मनाभ सिंह यांनी वंशावळ पोस्ट केली आहे. इतकंच नाही तर अयोध्येतला फोटोही पद्मनाभ सिंह यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीचा फोटोही शेअर केला आहे.
हे पण वाचा- “मधुर हास्य, बालपणीचा चेहरा, रोज येणारं माकड..”, रामलल्लाची मूर्ती साकारताना काय घडलं? अरुण योगीराज काय म्हणाले ?
प्रभू रामचंद्रांची राजधानी अयोध्या
कर्नल जेम्स टॉड यांचं पुस्तक ‘Annals and Antiquities of Rajasthan’यामध्ये उल्लेख आहे की अयोध्या ही प्रभू रामाची राजधानी होती. त्यांच्या मुलाने लवकोट अर्थात लाहोरची स्थापना केली. लव यांचे पूर्वज प्राचीन काळात गुजरातला गेले. त्यानंतर काही कालावधी गेल्यावर ते मेवाडला गेले असाही उल्लेख या पुस्तकात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.