देशातील करोनाच्या दैनंदिन बाधितांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी असली तरी धोका टळलेला नाही. करोनाची दुसरी लाट अजूनही काही भागात असल्याचे आढळून आले आहे. एकट्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की केरळचे १४ आणि महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की करोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. हा विषाणू अजूनही आहे. अशा परिस्थितीत, आपण निष्काळजीपणाने करोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे धोकादायक ठरणार आहे.

गेल्या आठवड्यात भारतात आढळून आलेल्या करोनाबाधितांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच ५३ टक्के बाधित हे महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले आहेत. करोनाचे संकट अद्याप टळले नसल्याचे केंद्राने शुक्रवारी सांगितले. “देश अजूनही दुसर्‍या लाटेसोबत लढत आहे आणि आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कारण आपल्याला वाटत आहेत की कोविड-१९ संपला आहे,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने पर्यटन स्थळावर होत असलेल्या गर्दीबाबतही भाष्य केलं आहे. “पर्यटन स्थळावरील परिस्थिती पाहून लोकं कोविड प्रोटोकॉलचे नियम पाळत नसल्याने हे चिंतेचे एक गंभीर कारण आहे आणि त्यामुळे विषाणू पसरण्याचा धोका वाढेल असे,” असे सरकारने म्हटले आहे.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना

COVID19 : देशभरात मागील २४ तासात ९११ रूग्णांचा मृत्यू ; ४३ हजार ३९३ नवीन करोनाबाधित आढळले

शुक्रवारी पत्रकार परिषदेत अग्रवाल म्हणाले की, देशभरात नवीन बाधितांमध्ये घट होत आहे. गेल्या आठवड्यात करोनाच्या नवीन बाधितांमध्ये ८ टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील ९० जिल्ह्यांमधून ८० टक्के नवीन बाधित समोर येत आहेत. करोना प्रोटोकॉलचे पालन करण्यावर भर देताना ते म्हणाले की रशिया, बांगलादेश आणि ब्रिटनच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला हवे, तिथे रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. अग्रवाल म्हणाले की नुकतीच ब्रिटनमध्ये युरो चषक २०२० चे आयोजन करण्यात आले होते आणि लोक फुटबॉल सामन्यांचा आनंद घेत होते. पण तिथे आता पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेबाबत भीती व्यक्त केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने ही सूचना जारी केली आहे. दरम्यान, देशातील सर्व हिलस्टेशन्स ते बाजारपेठेतील गर्दी होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या करोनाच्या नवीन बाधितांची संख्या ५०,००० पेक्षा कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी भारतात एकूण ४३,३९३  नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०७,५२,९५० झाली आहे. आजपर्यंत देशात २,९८,८८,२८४ जण करोनातून बरे झाले आहेत. तर ४,०५,९३९ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४,५८,७२७ आहे. आजपर्यंत देशात ३६,८९,९१,२२२ जणांचे लसीकरण झालेले आहे. यापैकी ४०,२३,१७३ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झालेले आहे.