शिवसेनेमध्ये फूट पाडणाऱ्या शिंदे गटाला आता १२ खासदारांचा पाठिंबा असल्याच्या वृत्तानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासादारांनी भेट घेतली. सध्या दिल्ली दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतल्याने राज्याबरोबरच केंद्रीय राजकारणामध्येही शिंदेंना समर्थन करणाऱ्या शिवसेना खासदारांची संख्या ही उद्धव ठाकरे समर्थक खासदारांपेक्षा अधिक असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांनी शिंदे यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे.

नक्की वाचा >> “जसं काही त्यांचं…”; नातवाचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंना टोला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेमध्ये फूट पाडणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला आता १२ खासदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा असतानाच दिल्लीत ही महत्वाची भेट झाली. शिंदे हे मध्यरात्री दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास ही भेट घडली.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे १२ खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर या भेटीमुळे आता शिंदे यांना या खासदारांचा पाठिंबा असल्याचं निश्चित मानलं जात आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही औपाचरिक घोषणा करण्यात आलेली नाही. शिंदे हे या खासदारांसह आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नक्की वाचा >> “७० वर्षांचा असूनही…”, रामदास कदमांनी बोलून दाखवली आदित्य ठाकरेंना ‘साहेब’ म्हणावं लागल्याची खंत; म्हणाले, “दीड वर्ष माझ्या…”

नक्की वाचा >>. “…म्हणून मी दिल्लीला आलोय”; मध्यरात्री दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

राष्ट्रपती निवडणुकीमुळे फूट
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यातच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदारांमध्येही फूट पडली.

नक्की वाचा >> “१२ नाही आमच्यासोबत एकूण…”; शिवसेना खासदारांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत पोहचल्यानंतर मोठा गौप्यस्फोट

ऑनलाइन हजेरीमुळे चर्चा…
शिंदे गटाच्या बैठकीत जवळपास १२ खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावल्याचे समजते. भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वप्रथम जाहीर मागणी करणारे राहुल शेवाळे यांच्याकडे शिंदे गटातील खासदारांचे गट नेतेपद देण्यात येईल अशी चर्चा आहे. विनायक राऊत, अरिवद सावंत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे हे सहा खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे सांगण्यात आले.

नक्की पाहा >> Photos: ‘मातोश्रीवर बोलवलं अन्…’, ‘बाळासाहेब असते तर..’, ‘हात जोडून विनंती केली पण…’; रामदास कदमांच्या हकालपट्टीचं कारण ठरलेलं पत्र

काल झाली महत्वाची बैठक
शिवसेनेत फूट पडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात बैठक झाली. त्यात शिवसेनेची कशी कोंडी करता येईल, यावर उहापोह झाला. शिवसेनेचे आपणच नेते व त्यामुळे पक्षाचे चिन्ह मिळावे, असा अर्ज शिंदे गटाकडमून निवडणूक आयोगाकडे लवकरच केला जाणार आहे. शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी नेमल्याची चर्चा सुरू झाल्याबाबत पत्रकारांनी दीपक केसरकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी त्यास दुजोरा देण्यास नकार दिला.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का?; सोनिया गांधींसोबतचा ठाकरेंचा फोटो शेअर करत नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल

शिवसेनेच्या बैठकीला केवळ पाच खासदार
शिवसेनेचे १२ बंडखोर खासदार शिंदे गटातील बैठकीत सहभागी झाल्याचे कळताच सोमवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत, अरिवद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. लोकसभेतील खासदार गजाजन कीर्तीकर दिल्लीत आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे लोकसभेतील पाच खासदारांनी बैठकीला हजेरी लावली. अन्य १२ खासदार गैरहजर राहिल्याने शिवसेनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

लोकसभाध्यक्षांना शिवसेनेचे पत्र
शिवसेना खासदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत हे सोमवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी गेले होत़े  मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही़  त्यामुळे त्यांनी बिर्ला यांच्या कार्यालयाला एक पत्र दिल़े  शिवसेनेच्या प्रतोदपदी राजन विचारे यांची निवड करण्यात आली असून, याबाबत पक्षाला पूर्वसूचना न देता कोणताही निर्णय घेऊ नये, असे पत्रात म्हटले आहे.

नक्की पाहा >> Photos: “मला वाटतं त्यांचं…”; २०० जागा जिंकण्याच्या CM शिंदेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकून पिकला एकच हशा

शिंदे समर्थक खासदार कोण?
१) भावना गवळी
२) राहुल शेवाळे
३) हेमंत गोडसे
४) धैर्यशील माने
५) संजय मांडलिक
६) राजेंद्र गावित
७) श्रीरंग बारणे
८) श्रीकांत शिंदे
९) सदाशिव लोखंडे
१०) प्रताप जाधव
११) कृपाल तुमाणे
१२) हेमंत पाटील