mayday1सोशल नेटवर्कींगच्या जालातील लोकप्रिय ट्विटर संकेतस्थळावर शुक्रवार सकाळपासून महाराष्ट्र दिनाच्या हॅशटॅगचा बोलबाला आहे. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘#महाराष्ट्रदिन’ हा मराठी हॅशटॅग सध्या टॉप ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ट्विटरकर आपल्या अकाऊंटवरून #महाराष्ट्रदिन या हॅशटॅगचा वापर करून आपल्या फॉलोअर्सला शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे ट्विटरवर आता मराठी हॅशटॅग्सना देखील चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. जागतिक कामगार दिनाचा #LabourDay हा हॅशटॅग सध्या अव्वल स्थानावर ट्रेंडमध्ये असून त्याखालोखाल #महाराष्ट्रदिन या मराठी हॅशटॅगचा ट्रेंड सुरू आहे.

Story img Loader