शौर्याचा अत्युच्च आदर्श निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील चार मुलांसह २५ बालकांना २४ जानेवारी रोजी राजधानीत होणाऱ्या शानदार समारंभात राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. त्यापैकी प्रतिष्ठेचा भारत पुरस्कार आपल्या चार मित्रांना वाचवते वेळी प्राणांची आहुती देणाऱ्या गौरव कवडुजी सहस्रबुद्धे याला मरणोत्तर जाहीर झाला आहे. तीन मुलींनीदेखील या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
दहावीत शिकणाऱ्या नागपूरच्या गौरवने हिंगणा रोडवरील टाकळी सीम भागातील अंबाझरी तलावात बुडणाऱ्या चार मुलांना स्वत:च्या जिवाची बाजी लावून वाचवले होते. ही घटना ३ जून २०१४ रोजी घडली होती. सुरुवातीला तीन मुलांना गौरवने वाचवले. परंतु चौथ्या मित्राला पाण्यातून सुखरूप बाहेर काढत असताना गौरवला प्राणाची आहुती द्यावी लागली होती. गौरवमुळे चार जणांना जीवदान मिळाले. या साहसी कर्तृत्वासाठी गौरवला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’ घोषित झाला आहे. गौरवची आई रेखा सहस्रबुद्धे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
गौरवसह मोहित महेंद्र दळवी, नीलेश रेवाराम भिल, वैभव रमेश घांगरे या महाराष्ट्रीय मुलांना शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. प्रतिष्ठेचा गीता चोप्रा पुरस्कार तेलंगणाच्या शिवमपेट रुचिताला जाहीर करण्यात आला आहे. या आठ वर्षांच्या चिमुरडीने ट्रेनला धडकलेल्या शाळेच्या गाडीतील दोघांचे जीव वाचविले. तर संजय चोप्रा पुरस्कार १६ वर्षीय अर्जुन सिंग याला देण्यात येईल. वाघाशी दोन हात करीत आईला वाचविताना त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. बापू गायधनी पुरस्कार मिझोरामच्या रामदिनतारा, गुजरातच्या राकेशभाई शानाभाई पटेल आणि केरळच्या आरोमल एस. एम. या किशोरांना देण्यात येईल. रामदिनतारा याने विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या दोघा जणांना वाचविले. राकेशभाईने विहिरीत पडलेल्या एका मुलाचे, तर आरोमलने बुडणाऱ्या दोघा स्त्रियांचे प्राण वाचविले.
इतर पुरस्कारार्थीमध्ये कशिश धनानी (गुजरात), मॉरिस येंगखोम व चोंगथाम कुबेर मैतेयी (मणिपूर), अँजेलिका तिनसाँग (मेघालय), साईकृष्ण अखिल किलांबी (तेलंगणा), जोईना चक्रवर्ती व सर्वानंद साहा (छत्तीसगढ), दिशांत मेहंदीरत्ता (हरयाणा), बीथोव्हन, नितीन फिलीप मॅथ्यू, अभिजीत के. व्ही. आनंदू दिलीप व मोहंमद शामनाद (केरळ) व अविनाश मिश्रा (ओडिशा) यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या भीमसेन आणि शिवांश सिंग यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहतील. ही शूरवीर बालके प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी होणार आहेत.

 

traffic video girl follow cars traffic rules video viral
“बाईSS… काय हा प्रकार”; भरट्रॅफिकमध्ये तरुणीनं केलेलं कृत्य पाहून नेटकरी चक्रावले; VIDEO पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
Kia launches Sonet Gravity| Kia Sonet Gravity Price Features Engine in Marathi
Kia launches Sonet Gravity: गणेशोत्सवात कार घ्यायचीय? KIAने केली सोनेट ग्रॅव्हिटी लॉंच, किंमत वाचून व्हाल थक्क
Prince Hisahito in Japan
Japanese Prince Hisahito: जपानचा राजकुमार झाला १८ वर्षांचा; प्रौढ होणारा ४० वर्षांतील पहिलाच मुलगा
Pear Fruit
नाशपती खाण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे; काय होतो याचा आरोग्यावर परिणाम
education department explained on Examination after recruitment of teachers
शिक्षकांची नियुक्तीनंतर परीक्षा? शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण…
CTET, CTET postponed, CTET exam, CTET latest news,
‘सीटीईटी’ लांबणीवर.. आता कधी होणार परीक्षा?
उन्हाळ्यातल्या भाज्या