‘महासेन’ चक्रीवादळाच्या धोक्याने बांगलादेश आणि म्यानमारमध्ये हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीच्या खालील भागाकडे सरकले आहे.
या वादळाचा फटका ८० लाखाहून अधिक लोकांना बसू शकतो असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. किनारपट्टीनजीक राहणाऱ्या हजारो लोकांना बांगलादेश सरकारने मदत छावण्यांमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. म्यानमारनेही जवळपास १ लाख ६६ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या नागरिकांना शाळांमध्ये हलवण्याची व्यवस्था लष्कराने केल्याचे म्यानमारच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे मंत्री अयुंग मिन यांनी सांगितले. अनेक जण घर सोडण्यास तयार नाहीत. मात्र कायद्याचा बडगा दाखवून आम्हाला त्यांना हलवणे भाग पडले असे स्पष्ट केले.

Story img Loader