हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. या सणानिमित्त सकाळपासून भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर लागल्याचं पाहायला मिळत आहे. करोना काळात बंद असलेली मंदिरं यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुली करण्यात आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. भाविकांकडून शिवमंदिरात शिवलिंगावर बेलपत्र आणि दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत बाबुलनाथ मंदिर, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये तर कोकणात कुणकेश्वर येथील शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भगवान शंकराची पूजा केली गेली.

वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी ओडिशा येथील समुद्रकिनाऱ्यावर भगवान शिवाची आकर्षक मूर्ती तयार केली आहे. यासाठी त्यांनी २३ हजारांहून अधिक रुद्राक्षांचा वापर केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात अभिषेक केला.

महाशिवरात्रीनिमित्त जम्मू काश्मीरमधील रेसी जिल्ह्यातील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शन घेतलं.

माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला येणारी शिवरात्री ‘महाशिवरात्री’ म्हणून साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ‘शिवरात्री’ म्हणतात. दरवर्षी सुमारे १२ शिवरात्री येतात, या बारा शिवरात्रींमध्ये येणारी महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान शंकराने या दिवशी तिला पत्नी म्हणून स्वीकारले, असे सांगितले जाते. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahashivratri 2022 ustav in india pooja vidhi rmt