भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्ष कोणत्याही तत्त्वावर आधारलेला नाही. स्वातंत्र्य मिळवण्याचे ते केवळ एक साधन होते आणि महात्मा गांधी एक चलाख व्यापारी होते, असे विधान शहा यांनी केले. महात्मा गांधींना पक्षाचे भवितव्य माहिती होते. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्यानंतर लगेच काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते. त्यावेळी त्यांनी तसे केले नाही. पण आता काही लोक ते काम पूर्णत्त्वास नेण्याचे काम करत आहेत, असा टोलाही त्यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला. अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते छत्तीसगडच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठीचे काँग्रेस हे साधन होते. या चळवळीत डाव्यांपासून, उजवे, समाजवादी आणि विविध विचारधारा असलेले लोक सहभागी झाले होते. ही स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीची एक चळवळ होती, असे शहा यांनी सांगितले.

अमित शहा काय म्हणाले, त्यांच्याच शब्दांत
काँग्रेस किसी एक विचारधारा के आधार पर, किसी एक सिद्धांत के आधार पर बनी हुई पार्टी ही नही, वो आझादी प्राप्त करने का एक स्पेशल परपज व्हेइकल है. आझादी प्राप्त करने का एक साधन था. बहुत चतुर बनिया था वो, उसको मालूम था आगे क्या होने वाला है. उसने आझादी के बाद तुरंत कहा था, काँग्रेस को बिखर देना चाहिए. महात्मा गांधीने नही किया, लेकिन अब कुछ लोग उसको बिखरने का काम समाप्त कर रहे है. इसीलिए ही कहा था महात्मा गांधीने, क्योंकि काँग्रेस की कोई आयडॉलॉजी ही नही थी, सिद्धांतो के आधार पर बनी हुई पार्टी ही नही थी. देश चलाने के, सरकार चलाने के कोई सिद्धांत ही नही थे.

विचारात स्पष्टता असल्यामुळे भाजपला कोणत्याही मुद्यावर भूमिका घेण्यास मदत होते, असेही त्यांनी या वेळी म्हटले.

त्यांना (काँग्रेस) कोणी असं म्हणेल, कोणी तसं म्हणेल, असं वाटत असतं. पण आमचे विचार स्पष्ट असल्यामुळे आमच्यात गोंधळ नाही. आम्ही स्पष्ट आहोत. जर कोणी देशाविरोधात घोषणा देत असेल तर त्याला देशद्रोही म्हटले जाईलच, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

देशात अस्तिवात असलेल्या १६५० पक्षांपैकी फक्त भाजप आणि दुसरे कम्युनिस्ट (मा) पक्ष यांच्यातच लोकशाही मुल्याची जपणूक केली जाते. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर राहुल गांधी हे पदभार घेतील. पण भाजपमध्ये पुढील अध्यक्ष कोण असेल, याचा कोणीच अंदाज लावू शकत नाही.