भटिंडाच्या रामा मंडी भागात असणाऱ्या गांधी पार्कमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (१५ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामा मंडी भागात असणारे गांधी पार्क उद्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयाला शेजारी आहे. उद्यान नागरिक रोज फिरण्यासाठी येतात. आज पहाटे फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना हा पुतळा तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा – ‘अहमद पटेल आणि तीस्ता सीतलवाड यांच्या कटामागे सोनिया गांधींचा हात’; भाजपाचा गंभीर आरोप

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत असल्याची माहिती एसएचओ हरजोत सिंग मान यांनी दिली. तसेच आरोपांना कठोर शिक्षा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा – “राज्य दोघांच्या भरवश्यावर अन् जनता वाऱ्यावर”; एकनाथ खडसेंचा राज्यसरकारवर हल्लाबोल

याप्रकरणानंतर शहर काँग्रेस अध्यक्ष अशोक सिंह यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप पंजाब सरकारवर केला. तसेच आरोपींच्या मनात कायद्याचा धाक नसल्याने, अशा घटना घडत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.