महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाच्या वेळी पुण्यातील येरवडा तुरूंगात असताना वापरलेल्या चरख्याचा ब्रिटनमध्ये लिलाव झाला. हा चरखा एक लाख दहा हजार पौंड (एक कोटी आठ लाख रूपये) विकला गेला. त्याचबरोबर गांधीजींच्या शेवटच्या इच्छापत्राचाही वीस हजार पौंड किंमतीत लिलाव करण्यात आला. गुजराती भाषेतील हे इच्छापत्र त्यांनी साबरमती आश्रमात लिहिले होते.
महात्मा गांधी यांनी हा चरखा त्यावेळी ‘अमेरिकी मिशनरी रेव्हरंड फ्लॉईड’ ए.पफर यांना भेट म्हणून दिला होता. ऐतिहासिक कागदपत्रे आणि वस्तू यांच्या ‘मुलॉक ऑक्शन हाऊस’ या संस्थेने घेतलेल्या या लिलावात या चरख्याला ६० हजार पौंड इतकी किंमत मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्याहीपेक्षा साधारणपणे दुप्पट किंमत चरख्याला मिळाली आहे.

Story img Loader