भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा मोठा भाऊ नरेंद्रसिंह धोनी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची त्यांच्या लखनऊमधील निवासस्थानी भेट घेऊन नरेंद्रसिंह धोनी यांनी अधिकृतरित्या समाजवादी पक्षात प्रवेश केला.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्रसिंह धोनी यांनी समाजवादीमध्ये प्रवेश केल्याचे वर्तविण्यात येत आहे. याआधी नरेंद्रसिंह यांनी २००९ साली भारतीय जनता पक्षात(भाजप) मध्ये प्रवेश केला होता. तसेच त्यावेळी निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारही त्यांनी केला होता. यावेळी नरेंद्रसिंह यांनी पक्ष भाजपला रामराम ठोकून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुलायमसिंह यांच्या भेटीवेळी धोनी यांच्याबरोबर झारखंडचे प्रदेशाध्यक्ष मिरज खानही उपस्थित होते.

Story img Loader