देशभरात चर्चेत असणारं दिल्ली सेवा विधेयक सोमवारी रात्री उशिरा राज्यसभेत मंजूर झालं. त्यामुळे आता राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी हे विधेयक पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा व राज्यसभेत या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी आधाडीने संख्याबळाच्या जोरावर हे विधेयक मंजूर करून घेतलं आहे. मात्र, या विधेयकावर राज्यसभेत झालेल्या सदस्यांच्या भाषणांदरम्यान काही गंमतीदार प्रसंगही निर्माण झाले. विशेष म्हणजे त्यात खुद्द राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर हेही सहभागी झाल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला!

काय घडलं सोमवारी संध्याकाळी?

राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर सोमवारी संध्याकाळी मोठी चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपापल्या भूमिका ठामपणे मांडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सरकारची बाजू ठामपणे मांडल्यानंतर संख्याबळाच्या जोरावर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. मात्र, त्याआधी विरोधी बाकांवरून या विधेयकाला तीव्र विरोध करण्यात आला. त्यात वरीष्ठ वकील व काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी हेही होते. त्यांनी केलेल्या आक्रमक भाषणानंतर त्यावर सत्ताधारी बाकांवरून दुसरे वरीष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी ‘युक्तीवाद’ केला आणि काही क्षण सर्व सभागृहाला आपण कोर्टातच बसलोय की काय? असा भास झाला असावा!

Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Karoline Leavitt named White House press secretary.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका, २७ वर्षीय तरुणी होणार व्हाईट हॉऊसची प्रेस सेक्रेटरी; कोण आहेत कॅरोलिन लेविट?
donald trump and joe biden meet at the white house
ट्रम्प-बायडेन यांच्यात दोन तास चर्चा; सत्तांतराची प्रक्रिया शांततेत होण्याची ग्वाही, ‘व्हाइट हाऊस’चे निवेदन
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

काय म्हणाले महेश जेठमलानी?

अभिषेक मनु सिंघवींच्या भाषणावर बोलताना संध्याकाळी पाचच्या सुमारास महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. “सर, डॉ. सिंघवींनी त्यांच्या भाषणात अनेक टीकात्मक विधानं केली. ते राज्यघटनेविषयीही भरपूर बोलले. पण मला त्यांच्या भाषणामध्ये राज्यघटनेच्या कायदेशीर बाजूचा उल्लेख दिसला नाही”, असं म्हणून जेठमलानी काही क्षण थांबले आणि अध्यक्ष महोदय म्हणण्याऐवजी थेट ‘युअर लॉर्डशिप्स’ (न्यायालयात न्यायमूर्तींना उद्देशून म्हणण्याचा प्रघात) म्हणाले. त्यांच्या या उल्लेखावर सभागृहात हशा पिकला.

पण आपण काय म्हणालो, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच महेश जेठमलानी यांनी आपली चूक सुधारून पुन्हा ‘माननीय अध्यक्ष महोदय’ असा उल्लेख केला. “एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या टोप्या डोक्यावर चढवणं (वेगवेगळ्या भूमिका निभावणं) फार अवघड आहे”, अशी टिप्पणी पुढे जेठमलानी यांनी जोडताच सभागृहात पुन्हा हास्याची लकेर उमटली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींच्या खटल्यात महेश जेठमलानी यांनी तक्रारदार पूर्णेश मोदी यांची बाजू मांडली होती.

उपराष्ट्रपतींची मिश्किल टिप्पणी!

दरम्यान, जेठमलानींच्या उल्लेखावर समोर सभापती स्थानी बसलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखर हेही हसू लागले. “आज मी ऐकत असलेले तुम्ही तिसरे वरीष्ठ वकील आहात. माझ्यावर विश्वास ठेवा. मी घरी जाईन आणि तुम्ही सगळ्यांनी बोललेला प्रत्येक शब्द वाचेन आणि नंतर वैयक्तिकरीत्या तुमच्याशी संपर्क साधेन”, असं म्हणत जगदीप धनखर यांनी मिश्किल टिप्पणी करताच सर्व सदस्य पुन्हा हसू लागले!

दिल्ली सेवा विधेयक मंजूर; राज्यसभेत ‘इंडिया’ आघाडीचा १३१ विरुद्ध १०२ मतांनी पराभव…

जेठमलानींचा सिंघवींना टोला!

यानंतर बोलताना महेश जेठमलानींनी कोर्टाच्या कामकाजातली जुनी म्हण सांगत अभिषेक मनु सिंघवींना टोला लगावला. “कोर्टाच्या कामकाजासंदर्भातली एक जुनी म्हण प्रचलित आहे. जेव्हा एक वकील कायद्यात निष्णात असतो, तो कायद्यावर आघात करतो. जेव्हा तो फॅक्ट्सबाबत निष्णात असतो, तो फॅक्ट्सवर आघात करतो. पण जेव्हा त्याच्याकडे या दोन्ही बाबतीतलं कौशल्य नसतं, तेव्हा तो विरोधी पक्षावर आघात करतो. समोरच्या बाकांवरून आत्ता तसंच काहीसं झालं”, असं जेठमलानी म्हणाले.