श्रीलंकेतील संसदीय निवडणुकीत अंतिम निकाल जाहीर होण्याच्या आधीच माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी पराभव मान्य केला आहे. युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्स (यूपीएफए) या आघाडीने युनायटेड नॅशनल पार्टी या पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांच्या पक्षाविरोधातील निवडणूक लढतीत पराभव पत्करला आहे. सध्याचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे हे आघाडी सरकारचे पंतप्रधान होत असून त्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे. मंत्र्यांची नेमणूक त्यानंतर करण्यात येणार आहे, युनायटेड नॅशनल पार्टी या पक्षाला साधे बहुमत मिळणार हे निश्चित झाले आहे.
यूएनपीला ९३ तर यूपीएफएला ८३ जागा मिळाल्या आहेत. चांगल्या लढतीनंतरही आपण पराभव पत्करत आहोत. यूपीएफएने आठ जिल्ह्य़ांत आघाडी घेतली तर यूएनपीने बावीसपैकी अकरा जिल्ह्य़ांत आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार यूएनपी किंवा यूपीएफए यांच्यापैकी कुणालाही बहुमत मिळणार नाही. २२५ सदस्यांच्या संसदेत ११३ जागा मिळणे आवश्यक आहेत. यूपीएफए पक्षाचा मोठा विजय जानेवारीतील अध्यक्षीय निवडणुकीत झाला होता. असे असले तरी यूएनपीच्या मतांवर त्याचा परिणाम झाला नाही. मार्क्‍सवादी जेव्हीपी किंवा पीपल्स लिबरेशन फ्रंट या संघटनांना या वेळी काही मतांचा फायदा झाला आहे.
प्रत्येक प्रमुख पक्षाने किती जिल्ह्य़ांत विजय मिळवला यावर अंतिम निकाल अवलंबून असल्याचे दोन वेळा अध्यक्ष बनलेल्या राजपक्षे यांनी म्हटले.
उत्तरेकडील तामीळ जिल्ह्य़ांमध्ये तामीळ नॅशनल अलायन्सने स्पष्ट आघाडी घेतली आहे. प्राथमिक निकालावरून तामीळ नॅशनल अलायन्स ही आघाडी जाफना जिल्ह्य़ातजिंकणार असून त्यांना साठ टक्के मते मिळाली आहेत. अध्यक्ष मथिरीपाला सिरिसेना यांनी यूपीएफएला बहुमत मिळाले, तरी राजपक्षे यांना पंतप्रधान होऊ देणार नाही असे ठरवले आहे. सिरिसेना हे गेल्या वर्षी अध्यक्ष राजपक्षे यांना आव्हान देणारे संयुक्त उमेदवार होते. पण त्याआधी ते
राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री होते. नंतर त्यांनी राजपक्षे यांना निवडणुकीत पराभूत केले. १९६ सदस्यांची निवड पाच वर्षांसाठी होत असून प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या मतांच्या प्रमाणात २९ जागांवर सदस्यांना नेमणूक मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा