तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप केला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेच्या आचार समितीला चौकशी करण्यास सांगितले. आज (२ नोव्हेंबर) मोईत्रा जबाब नोंदवण्यासाठी आचार समितीसमोर हजर झाल्या. मात्र, बैठकीत समितीच्या प्रमुखांनी महुआ मोईत्रांना आक्षेपार्ह खासगी प्रश्न विचारल्याचा आरोप या समितीतील काही सदस्य खासदारांनी केला. तसेच याचा निषेध म्हणून ते बैठकीतून बाहेर पडले. यावेळी त्यांनी संतापलेल्या अवस्थेत घडलेला प्रकार सांगितला.
यावेळी महुआ मोईत्रा आणि बसपाचे खासदार दानिश अली बैठकीतून बाहेर पडले. तसेच समितीचे अध्यक्ष आक्षेपार्ह व्यक्तिगत प्रश्न विचारत असल्याचा आरोप केला. दानिश अली म्हणाले, “आम्ही बैठकीतून निघून आलो कारण समितीचे प्रमुख महुआ मोईत्रा यांना रात्री कुणाशी बोलता, काय बोलता असे प्रश्न विचारत होते. तुम्ही हॉटेलमध्ये कुणाबरोबर थांबल्या होत्या, कुणी बिल दिलं, असेही प्रश्न विचारण्यात आले. हे मर्यादा ओलांडणारं आहे. एका महिलेचं चारित्र्यहनन करण्यासाठी आचार समिती स्थापन झालेली नाही.”
“तो गुप्त अहवाल एक दिवस आधीच ट्वीट करून जाहीर”
“आम्हाला सांगण्यात आलं की एनआयसीचा अहवाल गुप्त आहे. दुसरीकडे श्रीकांत दुबे एक दिवस आधीच ट्वीट करून किती वेळा या पोर्टलवर लॉग इन झालं हे सांगतात. कुणीही सरकारच्या विरोधात किंवा एखाद्या उद्योगपतीच्या विरोधात बोलू नये म्हणून हे प्रकरण रचण्यात आलं आहे,” असा आरोप दानिश अली यांनी केला.
“तुम्ही तुमच्या मित्राशी किती वेळा बोलला?”
माध्यमांशी बोलताना संयुक्त जनता दलाचे खासदार गिरीधर यादव म्हणाले, “समितीच्या प्रमुखाने एका महिलेला खूप व्यक्तिगत प्रश्न विचारले. त्यांना एका महिलेला खासगी प्रश्न विचारण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळेच आम्ही बैठकीतून निघून आलो. तुम्ही तुमच्या मित्राशी किती वेळा बोलला असेही प्रश्न विचारण्यात आले.”
“समितीचं वर्तन नैतिकतेला धरून नव्हतं”
काँग्रेस खासदार उत्तर कुमार रेड्डी म्हणाले, “समितीचं वर्तन नैतिकतेला धरून नव्हतं. ज्या प्रकारे महुआ मोईत्रा यांना प्रश्न विचारले गेले त्यावरून समितीचे प्रमुख इतर कुणाच्या सांगण्यावरून बोलत होते असं वाटलं. हे फार फार वाईट आहे. मागील दोन दिवसांपासून आम्ही त्यांच्याकडे काही गोष्टींची चौकशी करत होतो. एनआयसी पोर्टलप्रकरणी आम्ही माहिती मागितली. ते त्यावर प्रतिसाद देत नव्हते.”
हेही वाचा : चांदनी चौकातून : २३ वर्षांपूर्वीची आठवण..
“त्या कोठे गेल्या होत्या, कुठे भेटत होत्या?”
या प्रकरणात पैशाचा व्यवहार झाल्याचा काहीही पुरावा नाही. असं असतानाही समितीचे प्रमुख महुआ मोईत्रा यांना विचारत होते की, त्या कोठे गेल्या होत्या, कुठे भेटत होत्या, तुमच्या फोनचे रेकॉर्ड्स देऊ शकता का.