पीटीआय, नवी दिल्ली

अ‍ॅपल कंपनीकडून आयफोनवर सरकार-पुरस्कृत सायबर हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी आपल्यासह हा इशारा मिळालेल्या इतर खासदारांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी संरक्षण प्रदान करावे, अशी विनंती लोकसभा अध्यक्षांकडे केली.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

सरकारकडून केली जाणारी ही बेकायदा टेहेळणी हा राज्यघटनेने हमी दिलेल्या ‘मूलभूत हक्कांवरील सर्वात वाईट हल्ला’ असल्याचे मोइत्रा यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना अ‍ॅपल कंपनीकडून ‘सरकार-पुरस्कृत हल्लेखोर तुम्हाला लक्ष्य करत असल्याचा’ संदेश मिळाला आहे. हे हल्लेखोर दूरस्थ पद्धतीने उपकरणांमध्ये हस्तक्षेप करण्यासह त्यातील डेटा, संभाषणे आणि अगदी कॅमेरा व मायक्रोफोनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मोइत्रा यांनी या पत्रामध्ये पेगासस स्पायवेअरचीही आठवण करून देत विरोधी पक्षाच्या खासदारांना तातडीने संरक्षण प्रदान करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा >>>निवडक गोपनीयता, समान संधीचा अभाव! निवडणूक रोख्यांच्या योजनेवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

आज नीतिमत्ता समितीसमोर

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांच्या चौकशी प्रकरणी महुआ मोइत्रा आज, गुरुवारी नीतिमत्ता समितीसमोर हजर राहणार आहेत. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्यावर यासंबंधी आरोप केले आहेत.

Story img Loader